• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

SAW vs INDW : टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिका 8 विकेट्सने विजयी

April 19, 2026 by admin Leave a Comment


वनडे वर्ल्ड कप विजेता वुमन्स टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टी 20i मालिकेत सलग दुसऱ्या सामन्यातही निराशा केली आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेने सलग दुसरा विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत केला आहे. टीम इंडियाने शफाली वर्मा हीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान हे अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात 17 बॉलआधी पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 17.1 ओव्हरमध्ये 148 रन्स करत विजय नोंदवला.

टीम इंडियाकडून निराशा

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पाहुण्यात टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावलं. टीम इंडियाला संपूर्ण 20 ओव्हर खेळल्यानंतरही 150 धावाही करता आल्या नाहीत. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला डावातील शेवटच्या चेंडूवर 147 रन्सवर ऑलआऊट केलं. टीम इंडियासाठी शफाली वर्मा व्यतिरिक्त डेब्युटंट अनुष्का शर्मा हीने सन्मानजनक धावा केल्या. तर इतरांनी दक्षिण आफ्रिकेसमोर गुडघे टेकले.

शफालीने 38 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 7 फोरसह 57 रन्स केल्या. तर अनुष्काने 31 चेंडूत 28 धावा केल्या. त्याव्यरिक्त कुणालाही 20 हा आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी दोघींनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर इतर दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत टीम इंडियाला ऑलआऊट करण्यात योगदान दिलं.

दक्षिण आफ्रिकेचा सलग दुसरा विजय

दक्षिण आफ्रिकेची विजयी धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात झाली. कॅप्टन लॉरा वॉल्वार्ड आणि सुने लुस या सलामी जोडीने शतकी भागीदारी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजय निश्चित केला. या दोघींनी 106 धावांची भागीदारी केली. त्यानंतर ठराविक अंतराने आऊट झाल्या. मात्र दोघींनी दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चिच केला. लॉराने 34 बॉलमध्ये 54 रन्स केल्या. तर सुनेने 46 चेंडूत 57 धावा जोडल्या. तर तान्झिम ब्रिट्स हीने 20* आणि ॲनेरी डर्कसेनने 12* धावा करत दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं. टीम इंडियासाठी एकट्या श्रेयांका पाटील हीने दोन्ही विकेट्स मिळवल्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराणकडून भारताच्या जहाजावरील हल्ल्याबाबत प्रश्न विचारताच डोनाल्ड ट्रम्प संतापले, पत्रकाराची थेट हकालपट्टी
  • युद्धात भारतासाठी सर्वात मोठी खुशखबर, इराण-अमेरिका मिळून पाकिस्तानात…होर्मुझचा संघर्ष संपणार?
  • PPF: निवृत्तीनंतर आरामात जगा, महिन्याला मिळतील 61,000, पीपीएफची भन्नाट योजना
  • डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वांत भयंकर धमकी, पाकिस्तानात अटी मान्य न केल्यास आता…इराणमध्ये थेट मृत्यू तांडव!
  • फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तार करून…अंजली दमानियांची सडकून टीका; महिला आरक्षणावर बोलताना थेट आकडेच सांगितले!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in