• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PPF: निवृत्तीनंतर आरामात जगा, महिन्याला मिळतील 61,000, पीपीएफची भन्नाट योजना

April 19, 2026 by admin Leave a Comment


प्रत्येकाला वाटते रिटायरमेंटनंतर त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये कोणतेही काटकसर होऊ नये. तर तुम्हाला वाटते की नोकरीनंतर दर महिन्याला एक फिक्स आणि शानदार इन्कम तुमच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट व्हायला हवी तर पब्लिक प्रोव्हीडंट फंड (PPF) तुमच्यासाठी गेमचेंजर सिद्ध होऊ शकतो. चला तर या प्लानिंगला सोप्या भाषेत समजून घेऊयात…

या शानदार निवृत्ती फंडाचा प्रवास तुमच्या एका नियमित गुंतवणूकीतून सुरु होईल. तुम्हाला केवल दरवर्षी तुमच्या PPF अकाऊंटमध्ये कमाल मर्यादा म्हणजे १.५ लाख ( महिन्याला सुमारे १२,५०० रुपये ) जमा करावे लागतील. सुरुवातीला ही रक्कम तुम्हाला तुमच्या पगाराची एक मोठा हिस्सा वाटू शकते. परंतू दीर्घकालावधीतील ही शिस्तबद्ध गुंतवणूक तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते.

पैसा वेळेसोबत वाढतो अशी एक म्हण आहे. येथे खरा खेळ कपाऊंडिंग ( चक्रवाढ व्याज ) चा आहे. जर तुम्ही सलग २५ वर्षांपर्यंत तुमची गुंतवणूक सुरुच ठेवाल तर पीपीएफवर सध्या ७.१ टक्के वार्षिक व्याज मिळत असल्याने निवृत्तीनंतर तुमचा एकूण फंड १ कोटी ३ लाख रुपयांपर्यंत ( १.०३ कोटी रु. ) पोहचेल.

तुम्हाला आता वाटेल की एक कोटी रुपयांचा फंड झाला, परंतू दर महिन्याला ६१,००० कसे येतील. जेव्हा २५ वर्षानंतर तुमचा एक कोटी रुपयांचा कॉर्पस फंड तयार झाला. तर त्यातून मिळणारे व्याजच दरवर्षी ७.३ लाखाच्या आसपास होईल. या प्रकारे तुमच्या एक कोटी रुपयांच्या मुळ रकमेला न स्पर्श करता (Principal Amount) तुम्हाला व्याजाच्या रुपात दर महिन्याला ६०,००० ते ६१,००० रुपयांची शानदार इन्कम मिळत राहिल.

या संपूर्ण योजनेची सर्वात खास बाब म्हणजे याची सुरक्षा आणि टॅक्स बेनिफिट आहे. ही योजना पीपीएफ टॅक्सच्या 'EEE' (Exempt-Exempt-Exempt) कॅटगरीत येते. म्हणजे यात तुम्ही जी रक्कम गुंतवता त्यावर व्याज मिळते. आणि २५ वर्षानंतर संपूर्ण रक्कम तुमच्या हातात येते ती संपूर्ण टॅक्स फ्री असते. याशिवाय यावर सरकारीची गॅरंटी असते. यामुळे बाजाराच्या चढउताराचा यावर परिणाम होत नाही.

जर तुमचे वय आता २५ ते ३५ दरम्यानचे असेल तर तुम्ही शेअर बाजाराची रिस्क न घेता एक सुरक्षित आणि गॅरंटीड रिटर्न मिळवू इच्छीता तर हा प्लान तुमच्या साठी बेस्ट आहे. निवृत्तीनंतर ६१,००० रुपये महिना कमवणे हे काही सोपे नाही. यासाठी सुरु केलेली बचत उद्या तुम्हाला कोणत्याही आर्थिक तणावापासून वाचवू शकते. आणि बिनधास्त निवृत्तीचे जीवन जगण्यास मदत करु शकते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ अमेरिकेसाठी का आहे मौत का कुआँ ? काय आहेत आव्हाने ?
  • IPL 2026 Points Table : पंजाब पुन्हा नंबर 1, केकेआरच्या विजयामुळे मुंबई दहाव्या स्थानी
  • GT vs MI Live Streaming : मुंबईसमोर गुजरातला सलग चौथ्या विजयापासून रोखण्याचं आव्हान, सामना किती वाजता?
  • Vastu Shastra : हातात पैसा टिकतच नाही? मग करा हे 5 सोपे उपाय
  • PBKS vs LSG : पंजाबचा झंझावात कायम, पाचवा विजय, लखनौचा 54 धावांनी धुव्वा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in