
अभिनेत्री तब्बूने तिच्या आजवरच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तब्बू मुख्य भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येते. नुकताच तिचा 'भूत बंगला' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बूला या चित्रपटातील भूमिकेसाठी अडीच कोटी रुपये मानधन मिळालं आहे.
तब्बू सर्वसाधारणपणे तिच्या भूमिकेसाठी तीन कोटी रुपये मानधन स्वीकारते. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असतानाच आता तिने खासगी आयुष्यात एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे, तब्बूने मुंबईतील वर्सोवाच्या गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक केली आहे. तिने 2153 चौरस फूटांचं अपार्टमेंट खरेदी केलं आहे.
या अपार्टमेंटसाठी तिने तब्बल दहा कोटी रुपये खर्च केले आहेत. 26 मार्ट 2026 रोजी तिने हे अपार्टमेंट खरेदी केलं आहे. त्यासाठी तिने स्टँप ड्युटी म्हणून 5.25 लाख रुपये दिले आहेत. तर 30 हजार रुपये रेजिस्ट्रेशन फी भरली आहे.
तब्बूने या अपार्टमेंटसोबतच दोन कार पार्किंग एरियासुद्धा घेतलं आहे. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यासोबतच घराला 127 चौर फुटाची बाल्कनीसुद्धा आहे. तब्बूने ज्या इमारतीत अपार्टमेंट खरेदी केलं आहे, ती दोन वेगवेगळ्या टॉवर्समध्ये विभागलेली आहे. प्रत्येक टॉवरला 24 मजले आहेत. यामध्ये जवळपास 126 रेसिडेंशियल युनिट्स आहेत.
तब्बू चित्रपट आणि विविध गुंतवणुकींमधून कमाई करते. तिची संपत्ती जवळपास 22 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. तब्बू दरवर्षी तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करते. याशिवाय तिच्याकडे बीएमडब्ल्यू आणि ऑडी यांसारख्या महागड्या गाड्यासुद्धा आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
17 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या 'भूत बंगला' या चित्रपटात तब्बूने यशोदाची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती एका तेलुगू चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं नाव 'स्लमडॉग 33 टेम्पल रोड' असं आहे.






Leave a Reply