
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर नात जनाई भोसले पूर्णपणे खचली आहे. अंत्यविधीदरम्यान आणि त्यानंतर आयोजित केलेल्या शोकसभेत जनाईला सतत अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. आता एका पापाराझी पेजवर जनाईचा जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ती रीम शेखसोबत पहायला मिळतेय. हा व्हिडीओ पाहून जनाईने संबंधित पेजला सुनावलं आहे. पापाराझी पेजने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये जनाई आणि रीम कॅज्युअल आऊटफिट्समध्ये एकमेकींना मिठी मारताना आणि हसताना दिसत आहेत. याच क्लिपवरून जनाईने सुनावलं आहे.
संबंधित व्हिडीओवर कमेंट करत जनाईने लिहिलं, ‘हा व्हिडीओ जवळपास सहा महिन्यांपूर्वीचा आहे. मी सध्या प्रचंड दु:खात आहे. कृपया माझे असे व्हिडीओ पोस्ट करू नका.’ आशा भोसले यांच्या पार्थिवावर 13 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी त्यांना मुखाग्नी दिला. जनाई ही आनंद भोसले यांचीच कन्या आहे.
जनाईची कमेंट-

‘मी अत्यंत भावनाविवश झाले आहे. मला शक्य असेल तेव्हा मी काहीतरी लिहीन, पण मला हे आवर्जून सांगावंसं वाटतंय की, माझ्या आजीचा आदर करणारे असंख्य लोक आहेत. तिच्या अंत्यविधीला येऊन त्यांनी तिला तो सन्मान दिला आणि तिच्यावरील आपलं प्रेम व्यक्त केलं. मी सर्वांचे मनापासून आभार मानते. माझी आजी या आदरास आणि प्रेमास पात्र होती. मला वाटतं की आपल्या सर्वांच्या हृदयात कायम जिवंत राहील आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, तिने हे सर्व पाहिलं असेल’, अशा शब्दांत जनाईने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. आशा भोसले आणि जनाई यांच्यातील नातं खूपच खास होतं. जनाई तिच्या आजीच्या खूप जवळ होती. सोशल मीडियावर ती सतत त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करायची.
Leave a Reply