
भिवंडी येथे एका चारमजली धोकायदायक इमारत कोसळल्याने मोठी खळबळ माजील. भिवंडी महापालिका क्षेत्रातील नारपोली गंगाराम वाडी परिसरात काल रात्रीच्या 11.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ‘कोहिनूर’ नावाची ही धोकादायक इमारत होती. रात्रीच्या सुमारास ती कोसळून मोठी दुर्घटना झाली. एखाद्या पत्त्याचा बंगला जसा कसोळतो, तशी ही इमारत खाली कोसळली आणि क्षणार्धात भुईसपाट झाली. यामुळे मोठा गदारोळ माजला. या इमारतीच्या ढिगाऱ्यआखाली अनेक जण अडकलो हेते, दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, बचाव पथकातील अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेकांना जीव गमवावा लागला असून या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 5 वर पोहोचल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून बचाव पथक तसेच एनडीआरएफचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून युद्धपताळवीर बचावकार्य सुरू आहे. जवळपास 10 -11 तासांपासून ढिगारा उपसण्याचे आणि खाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याचा काम सुरू आहे. कोहिनूर ही इमारत महापालिका प्रशासनाने आधीच धोकादायक ठरवली होती, मात्र काही जण तिथे सामान काढण्यास गेले होते. मात्र काल रात्री ही इमारत कोसळल्यानंतर क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली, त्यांचा संसार तर मोडलाच पण आप्तस्वकीयांना गमवावं लागल्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
5 जणांचा मृत्यू
रात्री 11.30 च्या सुमारा इमारत कोळली आणि एकच हाहाकार माजला. आजूबाजूचे रहिवासी, नागरिक यांनी मदतीसाठी धाव घेतली, तसेच पोलीस बचाव पथकाचे अधिकारी यांनाही माहिती दिली. त्यानंतर एडीआरएपची टीमही घटनास्थळी दाखल आझले. आधी या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 3 ते 4 जण अडकल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र नंतर तो आकडा वाढल्याची भूीती व्यक्त करण्यात आली . नारपोली गंगाराम वाडी परिसरात असलेल्या ही इमारत रिकामी करण्यात आली होती. मात्र काही रहिवासी त्यांचे सामान, साहित्य काढण्यास गेले होते, त्यावेळीच ही इमारत पडल्याने ते अडकले. यय
धूळ, सिमेंट, ढिगाऱ्याकालून नागरिकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तब्बल 11 तासानंतर या ढिगाऱ्याखालून 5 वा मृतदेह एनडीआरएफच्या टीमने बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 5 मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढल्यानंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी, भिवंडीतील आय जी एम सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे समजते
Leave a Reply