• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प

June 19, 2026 by admin Leave a Comment


बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (BEST) कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतील बेस्ट बस सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून, लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मुंबईतील बहुतांश मार्गांवर बेस्ट बस सेवा बंद असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे कामावर आणि शाळा-कॉलेजांकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दादर, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांबाहेर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. टॅक्सी आणि रिक्षांसाठीही लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने सांगितले की, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संपाचा निर्णय घ्यावा लागला.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, कंत्राटी पद्धत रद्द करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती प्रक्रिया राबवणे आणि खासगीकरणाला आळा घालणे यांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबईत दररोज सुमारे 25 लाख प्रवासी बेस्ट बससेवेचा वापर करतात. तसेच बेस्टकडून सुमारे 10 लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. त्यामुळे या संपाचा परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह इतर सेवांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’
  • Marathi Language Row : रिक्षावाल्यांची इतकी मुजोरी, मुंबईत अचानक ऑटो-टॅक्सीचा इतका शॉर्टेज कसा झाला? कारण आलं समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in