• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच…

June 24, 2026 by admin Leave a Comment


बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांच्या विशेष पथकांनी विविध ठिकाणांहून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणात एकूण 9 आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.

विलास घुले यांच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत होते. मंगळवारी तर विलास घुले यांचा मृतदेह तब्बल 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका संशयिताने पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचे नाव घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.

या हत्या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आता विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आले आहे. IPS वेंकटरामा यांच्या अध्यक्षतेखाली हे विशेष तपास पथक काम करणार आहे. पोलिस प्रशासन विविध दिशांनी तपास करत असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रोज वेगळी बाई,उद्योगपती नवऱ्याती बिनधास्त पार्टी! बायकोचा आक्षेप नाही, ट्रोलिंग होताच…
  • BMC कर्मचारी महापौरांच्या समोरच मॅनहोलमध्ये पडला, रितू तावडे पाहातच राहिल्या; Video व्हायरल
  • Ketan Agarwal Case: लग्झरी कार, मोठा बिझनेस, सियाने हत्या केलेला केतन अग्रवाल काय करायचा? संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!
  • मारेकऱ्यांच्या तोंडी एकच नाव, विलास घुले प्रकरणात हादरवून टाकणारे पुरावे, रमेश घुले सगळं बाहेर काढणार!
  • Rishabh Pant दिल्ली कॅपिटल्स संघात येताच कर्णधार अक्षर पटेलने एका वाक्यात विषय संपवला, म्हणाला…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in