
गजानन उमाटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. सरकार आणि त्यांच्यातील विसंवादाने आंदोलन चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. त्याचवेळी आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. कुणबी नोंदीत घोळ घातल्याचा आरोप तायवाडे यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी सरकारकडे मोठी मागणी केली आहे.
बबनराव तायवाडे यांचा आरोप काय?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर २०२३ ते २०२६ या काळात मराठवाड्यात ४९ हजार ओबीसी नोंदी होत्या. यामध्ये अनेक नावांची दोन वेळा, तीन वेळा, चार वेळा आणि पाच वेळा दिसून येत आहे. मराठवाड्यात न्या. शिंदे समितीने ४९ हजार नोंदी शोधल्या. त्याची यादी त्या जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ४९ हजार नोंदीमध्ये अनेक नावांची पुनरावृत्ती झाली आहे. जालना जिल्ह्यातील यादीत पाच हजार २७ नोंदी, त्यात अनेक नाव चार ते पाच वेळा आली आहे, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.
तायवाडे यांची सरकारकडे मोठी मागणी
मनोज जरांगे पाटील म्हणतात त्या ५८ लाख ओबीसी नोंदी आणि शिंदे समितीनं तीन वर्षांत शोधलेल्या ४९ हजार नोंदीची चौकशी करा. त्यांची स्क्रुटणी करा, अशी मागणी तायवाडे यांनी केली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर २०२३ ते २०२६ या काळात मराठवाड्यात ४९ हजार ओबीसी नोंदी आहेत. यामध्ये अनेक नावांची दोन वेळा, तीन वेळा, चार वेळा आणि पाच वेळा दिसून येते आहेत. ओबीसी नोंदी शोधल्या यात अनेक नावांचं रिपीटेशन, ती वगळून नव्याने यादी जाहिर करावी, अशी मागणी तायवाडे यांनी केली.
वेट अँड वॉचच्या भूमिकेत
जरांगे पाटील आणि सरकारच्या भुमिकेकडे आमचं लक्ष आहे. आम्ही वेट ॲंड वॅाचच्या भूमिकेत आहोत, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत तायवाडे यांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचा दावा केला होता. पण सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाखाली काही निर्णय घेणार असेल. ओबीसीच्या ताटातील काढून दुसऱ्यांना देणार असेल तर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Leave a Reply