
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी छगन भुजबळ यांच्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. जर ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर भुजबळांसोबत रस्त्यावर उतरण्यासही महासंघ तयार असल्याचे तायवाडे यांनी म्हटले.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेचे आणि वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू या भूमिकेचे तायवाडे यांनी समर्थन केले. ओबीसी आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागू नये, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास त्यांनी विरोध केला. मराठा समाजाला मिळणाऱ्या सर्व सोयी-सवलती ओबीसी समाजालाही मिळाव्यात अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
भुजबळ साहेब ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते असल्याने, त्यांच्या प्रत्येक भूमिकेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पूर्ण पाठिंबा राहील. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे आता लक्ष देत नसून, सरकार त्यांच्या भूमिकेवर काय निर्णय घेते, याकडे लक्ष असल्याचे तायवाडे यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply