
बिग बॉस मराठी 5 चा विजेता रील स्टार सूरज चव्हाण हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सूरज चव्हाण याला अलिशान बंगला दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधून दिला आहे.
त्यातच सूरज चव्हाण याच्या आयुष्यात आनंदाची उधण झाली. जन्माष्टमीच्या दिवशीच आनंदाची बातमी पुढे आली. 2022 मध्ये सूरज चव्हाण आणि संजना यांचे लग्न झाले. दोघेही अगोदरचेच नातेवाईक आहेत.
सूरजची पत्नी संजना हिने गोंडस मुलीला जन्म दिला. प्रेग्नंसीदरम्यानचे अनेक फोटो सूरज याने त्याच्या स्टाईलमध्ये सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यातच आता सूरज आणि संजना यांच्या बाळाची पहिली झलक पुढे आली.
हॉस्पिटलमधील व्हिडीओ पुढे आला. सूरज आणि संजना यांचे बाळ त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.संजना ही निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. पूर्ण चव्हाण कुटुंबात आनंदाचे वातावरण दिसत आहे.
फोटोमध्ये बाळाची पहिली झलक दिसत आहे. या फोटोमध्ये संजना हिने बाळ आपल्या हातात घेतल्याचे दिसत आहे. सूरज चव्हाण हा संजना हिच्याकडे भावूक होऊन बघताना दिसतोय. सूरज आणि संजना यांच्या लग्नाला 9 महिने पूर्ण झाली आहेत. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला अजून 9 महिने पूर्ण झाली नाहीत, तोवरच संजना हिने आनंदाची दिली.




Leave a Reply