• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6, 6, 6, 6, 6… आणि 100! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्मृती मंधानाच्या रडारवर दोन विश्वविक्रम

September 5, 2026 by admin Leave a Comment


वुमन्स आशिया कप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे. भारत पाकिस्तान म्हंटलं तर उत्सुकता असते. पण गेल्या काही वर्षात भारतीय संघ पाकिस्तानच्या खूप पुढे निघून गेला आहे. इतकंच काय तर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर या सामन्यात प्रचंड दबाव असणार आहे. हा सामन्याआधीच भारताची स्थिती मजबूत असल्याचं दिसून येत आहे. असं असताना या सामन्यात क्रीडाप्रेंमीच्या नजरा भारताची सलामीवीर स्मृती मंधानावर खिळल्या आहेत. कारण या सामन्यात तिच्या रडारवर दोन मोठे विक्रम असणार आहेत. मागच्या सामन्यात तिचं झंझावाती शतकी खेळी पाहिल्यानंतर तसंच म्हणावं लागेल. कारण स्मृती मंधाना फॉर्मात आहे आणि आरामात दोन विश्वविक्रम आपल्या नावावर करू शकते.

स्मृती मंधानाला पाकिस्तानविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 षटकार आणि सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रचण्याची संधी आहे. स्मृती मंधानाचा आक्रमक खेळ पाहता पाकिस्तानसमोर हा विक्रम रचला जाण्याची शक्यता आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम न्यूझीलंडच्या सूजी बेट्सच्या नावावर आहे. तिने 186 सामन्यातील 178 डावात 4758 धावा केल्या आहेत. स्मृती मंधानाने 173 सामन्यातील 167 डावात 4681 धावा केल्या आहेत. म्हणजेच हा विश्वविक्रम रचण्यासाठी तिला फक्त 78 धावांची गरज आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या विक्रमासह आणखी एक विक्रम रडारवर असणार आहे. हा विक्रम आहे 100 षटकार मारण्याचा… पाकिस्तानविरुद्ध हा विक्रम पूर्ण करण्याची संधी आहे. पाकिस्तानविरुद्ध 5 षटकार मारताच षटकारांचं शतक पूर्ण करेल. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या नजरा स्मृती मंधानाच्या खेळीकडून लागून आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध स्मृती मंधानाने हा विक्रम पूर्ण करावा अशीच क्रीडाप्रेमींची इच्छा आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगाला ज्याची भीती तेच घडलं, अमेरिकेचा इराणला मोठा दणका, थेट हल्ला, तेलाच्या किमती..
  • तांब्या, पितळेच्या भांड्यावरील हट्टी डाग जात नाहीत? झटपट चमकदार बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स
  • मुंबईत पहिली दुर्घटना, मालाडमध्ये दहीहंडी फोडताना मुलाचा मृत्यू
  • चीन सर्वात मोठ्या संकटात? शी जिनपिंग यांना दोनदा हार्ट अटॅक, तख्तापलट होणार? नेमकं काय घडतंय?
  • मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in