• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

चीन सर्वात मोठ्या संकटात? शी जिनपिंग यांना दोनदा हार्ट अटॅक, तख्तापलट होणार? नेमकं काय घडतंय?

September 5, 2026 by admin Leave a Comment


चीनवर पहिल्यांदाच सर्वात मोठं संकट घोंघावताना दिसत आहे. चीनमध्ये तख्तापलट होण्याची चिन्हे दिसत आहेत. चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा उत्तराधिकारी शोधण्याचं काम सुरू झालं आहे. जिनपिंग यांना शरीर साथ देत नाहीये? जिनपिंग यांच्यावर कामाचा ताण आहे? असे सवाल केले जात आहेत. त्याला कारण म्हणजे जिनपिंग यांना दोनदा हार्ट अटॅक आला आहे. जर जिनपिंग यांनी त्यांचा उत्तराधिकारी स्वत: निवडला तर चीनमध्ये यादवीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तिबेटच्या एका नेत्यानेच हा दावा केल्याने जगभर खळबळ उडाली आहे.

चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या आरोग्याबाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे. तिबेटचे माजी निर्वासित पंतप्रधान लोबसांग सांगेय यांनी जिनिपिंग यांच्या तब्येतीविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. दिल्लीतील एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत सांगेय यांनी हा दावा केला आहे. सांगेय यांच्या या दाव्यानंतर चीनपासून जगभर चर्चांना उधाण आलं आहे. जिनपिंग नुकतेच किर्गिस्तानात SCO समिटमध्ये भाग घेण्यासाठी आले होते. त्याचा एक व्हिडीओ आला आहे. त्यात ते पत्नीसोबत प्लेनमधून उतरताना दिसत आहे. जिनपिंग यांनी पत्नीचा हात पकडलेला आहे. या व्हिडीओनंतर तिबेटच्या या नेत्याने जिनपिंग यांच्या आरोग्याबाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे.

दोनदा हार्ट अटॅक

मी चीनच्या एक बड्या अधिकाऱ्याची भेट घेतली होती. त्याचं नाव मी सांगणार नाही. त्याने मला जिनपिंग यांच्या आरोग्याविषयची माहिती दिली आहे. जिनपिंग यांना तीन नाही, पण किमान दोन हार्ट स्ट्रोक आले आहेत. शी जिनपिंग अचानक तीन ते पाच आठवडे अचानक गायब झाले होते. त्यानंतर अचानक प्रकट झाल्याचं तुम्हाला आठवतं का? असा सवाल सांगेय यांनी केला. सांगेय यांच्या दाव्यानुसार, जिनपिंग यांना दोनदा हार्ट अटॅक आला आहे. त्यानंतर चीनच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा जोर धरू लागली आहे. चीनच्याच एका अधिकाऱ्याशी गप्पा मारत असताना त्याने ही माहिती दिल्याचंही सांगेय यांनी सांगितलं.

जिनपिंग यांच्यावर खूप ताण आहे. त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत आहे. त्यांचं चेहरा तुम्ही पाहा. नेहमीच फुगलेला असतो. त्यांच्या चालण्यातही फरक पडला आहे. म्हणजेच त्यांच्यावर कामाचा अधिक ताण आहे. म्हणूच त्यांच्यावर परिणाम होत आहे. त्यामुळेच त्यांना हार्ट अटॅक आल्याचंही ते म्हणाले.

मानसिक थकव्यामुळे त्यांना निर्णय घेण्यात त्रास होत आहे. त्यामुळे त्यांनी मिलिट्रीच्या सीनिअर जनरलांना कामावरून काढून टाकलं. चीनमधून अनेक जनरल गायब झाले आहेत. संरक्षण मंत्री गायब आहे, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, सांगेय यांच्या या दाव्यानंतर चीनकडून वृत्ताचं खंडन करण्यात आलेलं नाही. जिनपिंग यांना दोन हार्ट अटॅक आले नाहीत, असं कुणी स्पष्ट केलं नाही. तसेच तसा पुरावाही कुणी दिलेला नाही.

उत्तराधिकारी निवडणं आव्हानात्मक

केवळ जिनपिंग यांच्या तब्येतीबाबतच सांगेय बोलले नाही, तर त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला. जिनपिंग यांचा उत्तराधिकारी शोधला जात आहे. पण तो शोधणं हे आव्हानात्मक काम आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उत्तराधिकारी निवडणं धोकादायक आहे, तसेच उत्तराधिकारी न निवडणं हे सुद्धा धोकादायक आहे. जिनपिंग यांच्यासाठी ही द्विधा स्थिती आहे. चीनमध्ये निवडण्यात आलेला नवा नेता भविष्यात त्यांच्या सत्तेसाटी प्रतिद्वंदी बनू शकतो. जिनपिंग यांनी पद सोडलं किंवा सत्ता सोडली तर देशात अनिश्चितता तयार होईल. त्यामुळे अंतर्गत संघर्ष सुरू होतील, असा दावाही त्यांनी केला आहे.

उत्तराधिकारीची घोषणा का नाही?

उत्तराधिकारी निवडणल्यास तो धोकादायकही ठरू शकतो. शिवाय उत्तराधिकारी निवडल्याने नाराजांची फौजच निर्माण होऊ शकते. त्यामुळे देशात अंतर्गत यादवी माजू शकते. म्हणूनच उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली जात नसल्याचाही दावा करण्यात आला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dahi Handi 2026 : गौतमी पाटील नाही, या नृत्यांगनेचा भन्नाट डान्स, अनेकांच्या हृदयाचा चुकला ठोका
  • IND W vs PAK W: पाकिस्तानविरुद्ध हरमनप्रीत कौर रचणार इतिहास, नाणेफेकीला उतरताच नावावर करणार विक्रम
  • पुण्याच्या सणसवाडीत धक्कादायक घटना, इसमाने रागाने स्वत:चे मनगट तोडले
  • Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास…
  • मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, गोपिचंद पडळकरांचा ताफा अडवला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in