• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, गोपिचंद पडळकरांचा ताफा अडवला

September 5, 2026 by admin Leave a Comment


मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. दरम्यान त्यानंतर आता मराठा आंदोलक देखील चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. सोलापूर-रत्नागिरी महामार्गावर कामती येथे मराठा आंदोलकांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा ताफा अडवल्याची घटना घडली आहे. मराठा आरक्षणाबाबत तसेच मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाबाबत भूमिका जाहीर करा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली, त्यानंतर लगेचच गोपिचंद पडळकर यांनी देखील आपली भूमिका जाहीर केली आहे.

नेमकं काय म्हणाले गोपिचंद पडळकर? 

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. दरम्यान त्यानंतर आता मराठा आंदोलक देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी आज भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांचा ताफा अडवला, मनोज जरांगे पाटील याचं उपोषण सुरू आहे, मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करा अशी मागणी या आंदोलकांनी गोपिचंद पडळकर यांच्याकडे केली, दरम्यान यावर बोलताना गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं की, मराठा समाजाच्या एसईबीसी आणि कुणबी आरक्षणाला आमचा कायम पाठींबा आहे. मात्र खाडाखोड केलेला कुणबी दाखला रद्दच होणार आहे, अशी भूमिका यावेळी मराठा आरक्षणाबाबत पडळकर यांनी जाहीर केली आहे. दरम्यान पडळकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्यानंतर मराठा आंदोलकांनी देखील त्यांचं स्वागत केलं.

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आठवा दिवस 

दरम्यान मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे, त्यांची प्रकृती देखील खालवली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिलं होतं, मात्र त्यानंतर त्यांनी सरकारला दोन दिवसांचा वेळ दिला होता, त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shah Rukh Khan : पाहिजे तर गोळी घाला, पण.. अंडरवर्ल्डची धमकी मिळूनही झुकला नाही शाहरुख खान
  • भारतीयांनी बनवलेल्या कंपन्यांनी जगाचे नेतृत्व का करु नये?, नरेंद्र मोदी यांनी सादर केले विकसित भारताचे व्हीजन
  • मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अखेर मोठ यश, सरकारने घेतला मोठा निर्णय, घडामोडींना वेग
  • एक लाख नोकऱ्यांना कायमचे संपवणार ही कंपनी, इलेक्ट्रीक कारचा फटका ?
  • मोठी बातमी! रशियानं, युक्रेनमध्ये युद्धविराम, पुतीन यांची तडकाफडकी मोठी घोषणा, अमेरिकेचे..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in