• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक लाख नोकऱ्यांना कायमचे संपवणार ही कंपनी, इलेक्ट्रीक कारचा फटका ?

September 5, 2026 by admin Leave a Comment


फॉक्सवॅगन (Volkswagen) या एका प्रमुख जर्मनी ऑटोमोबाईल निर्माता कंपनी आता भारतातील खर्च कमी करण्यासाठी री-स्ट्रक्चरिंग प्लान करत आहे. Skoda Auto Volkswagen कंपनी तीन वर्षांत हा प्लॅन अमलात आणत आहे. या अंतर्गत भारतातील 12% वर्कफोर्स कमी होणार आहे. Volkswagen च्या नव्या योजनेनुसार ही कार कंपनी मोठ्या बदलातून जात आहे. कंपनीने खर्च करण्यासाठी आणि कामकाजाला नव्या पद्धतीने ऑर्गेनाईज करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची संख्या घटवण्याचा निर्णय घेतला आहे.

Volkswagen ने नव्या योजनेनुसार साल 2030 पर्यंक जगभरातील एक लाख नोकऱ्या घटवणार आहे. यातील सुमारे 50 हजार नोकऱ्यांची कपात आधीच केली आहे. आता सुमारे 50 हजार आणखी पदे कमी करणाऱ्यावर सहमती व्यक्त केली आहे. यामुळे ऑटो इंडस्ट्रीची सर्वात मोठी रि-स्ट्रक्चरिंग योजनेपैकी एक मानली जात आहे.

1 लाख पदे कमी करण्याची योजना

Volkswagen ने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती आणि बदलती ऑटो इंडस्ट्रीशी जोडलेली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की आपल्या वर्कफोर्स बाजाराच्या गरजेनुसार एडजस्ट करण्याची गरज आहे. नवीन निर्णयानुसार दशकाच्या अखेर पर्यंत एकूण एक लाख पदे कमी करण्याची योजना आहे. ही संख्या कंपनीच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या 15 टक्के आहे.

Volkswagen साठी सर्वात मोठे आव्हान चीनचा कार बाजार आहे. चीनमध्ये स्थानिक कंपन्या वेगाने इलेक्ट्रीक कार आणि नवीन टेक्नॉलॉजी वाले मॉडेल आणत आहेत. किंमत आणि टेक्नॉलॉजी प्रकरणात वाढत्या स्पर्धेने Volkswagen ला दबावाचा सामना करावा लागत आहे. चीनमध्ये विक्री घटण्याचा परिणाम कंपनीच्या व्यवसायावर झाला आहे.

ऑटो इंडस्ट्री वेगाने पेट्रोल – डिझेल कारकडून इलेक्ट्रीक कारकडे वळत आहेत. मात्र, इलेक्ट्रीक कारची मागणी प्रत्येक बाजारात सारखी नाही. फॉक्सवॅगनला देखील EV सेगमेंटमधील बदलती मागणी आणि वाढत्या स्पर्धेच्या दरम्यान आपले धोरणात बदल करावा लागत आहे. कंपनी कमी खर्चात जास्त मॉडेल तयार करणे आणि आपल्या कामकाजाला जास्त प्रभावी बनवण्यावर जोर देत आहे.

अमेरिकेत युरोपीय कारवर टॅरिफ वाढवल्याने कंपनीचा खर्च प्रभावित झाला आहे. याशिवाय युरोपमध्ये मागणी कमजोर राहिल्याने आणि चीनच्या वाढत्या स्पर्धेने कंपनीच्या अडचणी आणखी वाढल्या. या सर्व कारणांनी फॉक्सवॅगनने आपल्या खर्च आणि प्रोडक्शनला कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

कंपनीच्या या पुनर्रचनेचा परिणाम जर्मनीमधील तिच्या काही प्रमुख प्रकल्पांवरही होऊ शकतो. Emden, Zwickau, Hanover आणि Neckarsulm येथील प्रकल्पांमध्ये भविष्यात उत्पादन बंद करण्याच्या किंवा त्यात बदल करण्याच्या योजनांवर कंपनीने चर्चा केली आहे. या ठिकाणचे उत्पादन 2031 ते 2034 दरम्यान बंद होऊ शकते.मात्र, याचा अर्थ असा नाही की सर्व प्रकल्प तात्काळ बंद होतील.

फोक्सवॅगनचे धोरण केवळ कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यापुरती मर्यादित नाही. कंपनी आपल्या मॉडेल्सची संख्या कमी करण्याचीही तयारी करत आहे. कमी मॉडेल्सवर अधिक लक्ष केंद्रित करणे आणि उत्पादन अधिक कार्यक्षम करणे हा यामागील उद्देश आहे. युरोपमध्ये, कंपनीची उत्पादन क्षमता तिच्या विक्रीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे अतिरिक्त क्षमता कमी करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवी ठरली घातक ?, ग्लेशियर वितळण्यास जबाबदार ?
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मिळाली मानवी किडनी…
  • IND W vs PAK W : 27वर 1 विकेट अन् 55वर ऑलआऊट; टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली, आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in