• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवी ठरली घातक ?, ग्लेशियर वितळण्यास जबाबदार ?

September 5, 2026 by admin Leave a Comment


जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी दरवर्षी गिर्यारोहकांचे जथ्ये येथे जमा होत असल्याने निराळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. ग्लेशियर वितळल्याने नेपाळमध्ये आलेल्या भयानक पुराने उद्धवस्थ नेपाळ सावरला नसताना आता एव्हरेस्टचे ग्लेशियर मानवी मूत्रामुळे विरघळत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मानवी लघवीने प्रत्येक गिर्यारोहण हंगामात टनांमागून टन बर्फ वितळत असल्याचे म्हटले जात आहे.

मानवी लघवीमुळे प्रत्येक गिर्यारोहण हंगामात टनांमागून टन बर्फ वितळत आहे.दरवर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प ‘खुंबू हिमनदी’वर (Khumbu Glacier) उभारला जात असतो. दरवर्षी ग्लेशियरवर स्वयंपाक, शॉवर, जनरेटर, वाय-फाय आणि काही ठिकाणी ‘हीटेड फ्लोअर्स’अशा सुविधांनी सज्ज असलेले तंबू बेस कॅम्पवर उभारले जात असतात. त्यामुळे ही निर्माण होणाऱ्या उष्णतेने तापमानाने हिमालयातील ग्लेशियर वितळत असतात असे म्हटले जात आहे.

नेपाळी आणि अमेरिकन शास्त्रज्ञांच्या एका गटाने ‘रिजनल एन्व्हायर्नमेंटल चेंज’ (Regional Environmental Change) या नियतकालिकात प्रकाशित केलेल्या अभ्यासात मानवी हालचालींने ग्लेशियर कसे वितळत आहेत याचे दाखले दिले आहेत.

६,७६६ लिटर लघवीचे उत्सर्जन

जागतिक तापमानवाढ आणि जीवाश्म इंधनाचा वापर यांसोबतच, मानवी लघवीमुळे देखील ग्लेशियर कसे वितळत आहेत, यावर या नवीन अभ्यासात भीती व्यक्त करण्यात आली आहे. अधिक उंचीवर गिर्यारोहकांना जास्त पाणी प्यावे लागते आणि परिणामी त्यांना लघवीही जास्त करावी लागते. संशोधकांच्या मते, २०२३ च्या हंगामात दररोज सुमारे ६,७६६ लिटर लघवीचे उत्सर्जन झाले. केवळ लघवीमध्ये बरीच उष्णता असते आणि ग्लेशियर मोठ्या प्रमाणात वितळवण्यासाठी ती पुरेशी असते असे खिम लाल गौतम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटले आहे.

केवळ एका गिर्यारोहण हंगामात ग्लेशियरचा १५४ टन बर्फ वितळला आहे. मात्र, मानवी लघवी हा येथील सर्वात मोठा घटक नाही. शरीरातून बाहेर पडताना लघवीचे तापमान सुमारे ३७ अंश सेल्सिअस असते आणि मात्र बाहेर पडताच थोड्या वेळाने ती थंड होते. या स्थितीतही ती कितीसा बर्फ वितळवू शकेल, याची गणना संशोधकांनी केली. त्यातील केवळ थोडीशी उष्णता बर्फापर्यंत पोहोचते.कारण उर्वरित उष्णता एकतर हवेत किंवा खडकांमध्ये निघून जाते असे संशोधकांचे म्हणणे आहे.

बर्फ वितळण्यास इंधनही जबाबदार

मूळ समस्या मानवी लघवीची नसून ‘बेस कॅम्प’जीवाश्म इंधनाच्या वापराने मोठी समस्या निर्माण झाली आहे. केवळ २०२३ च्या हंगामात, स्वयंपाक, हीटर आणि विजेसाठी एलपीजीचे ८२४ सिलिंडर, १८,९३५ लिटर रॉकेल आणि ५,१३० लिटर पेट्रोलचा वापर करण्यात आला. मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेत याचा वाटा सुमारे ९४ टक्के होता, तर लघवीचा वाटा केवळ ६ टक्के होता असे संशोधकांनी सांगितले.

हिमालयातील तापमान इतर प्रदेशांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. ‘सायन्स ॲडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित झालेल्या २०१९ च्या अभ्यासानुसार, २००० नंतरच्या काळात बर्फ वितळण्याचे प्रमाण त्याआधीच्या कालावधीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहे.खुंबू हिमनदीच्या (Khumbu Glacier) इतर भागांच्या तुलनेत बेस कॅम्पमधील पृष्ठभागाचे तापमान अधिक वेगाने वाढत आहे; हे तापमान दरवर्षी सुमारे ०.२८ अंश सेल्सिअसने वाढत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

बेस कॅम्पचे स्थलांतर

बेस कॅम्प हलवावा का ? आणि हलवायचा झाल्यास तो कुठे हलवावा ? याचा अभ्यास या पथकाने केला. त्यांनी सध्याच्या कॅम्पच्या नैऋत्य दिशेला दोन जागा निश्चित केल्या. मात्र, कॅम्प हलवल्यास व्यवस्थापनाशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात आणि नवीन ठिकाणीही आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू शकते.कचरा व्यवस्थापन सुधारण्यावर आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर द्यायला हवा असे संशोधकांनी म्हटले आहे. खुंबू हिमनदी वाचवण्यासाठी कॅम्पचा काही भाग हलवता येऊ शकतो. परंतु, मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारी उष्णता ही समस्या अधिक गंभीर करू शकते असेही संशोधकांचे म्हणणे आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांची लघवी ठरली घातक ?, ग्लेशियर वितळण्यास जबाबदार ?
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • 6 September Horoscope : पैसा, नोकरी, घर, सगळंच मिळणार, या चार राशींसाठी आजचा दिवस खास!
  • पोटात डुकराची किडनी, तरी डायलिसीस शिवाय जगला नऊ महिने, नंतर मिळाली मानवी किडनी…
  • IND W vs PAK W : 27वर 1 विकेट अन् 55वर ऑलआऊट; टीम इंडियाने पाकिस्तानची हवाच काढली, आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in