
ठाण्यातील मानाच्या टेंभी नाक्याच्या दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोविंदा उत्साहात साजरा होत असून, टेंभी नाक्याची दहीहंडी ही दिघे साहेबांची मानाची हंडी म्हणून ओळखली जाते असे शिंदे यांनी नमूद केले. गोविंदा हा सण एकजूट आणि सांघिक कार्याचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला असून, गोविंदासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
१.६० लाख ते २ लाख रुपयांपर्यंत गोविंदा पथकांचा विमा काढण्यात आला आहे, तसेच ‘प्रो गोविंदा’ म्हणून या खेळाला ओळख देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोना काळानंतर गोविंदा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याच्या सूचना आपण मुख्यमंत्री असताना दिल्या होत्या, असे शिंदेंनी सांगितले. गोविंदा उत्सव साजरा करताना कोणीही जखमी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांनी जोपासलेली ही संस्कृती आणि परंपरा जपण्याचे काम सुरू असल्याचे शिंदेंनी या वेळी स्पष्ट केले.
Leave a Reply