• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Swara Bhasker : मुस्लिमाशी लग्न करून चारित्र्याला धक्का लावला…, ‘जौहर’ वादावरून बड्या नेत्याची स्वरा भास्करवर टीका

September 5, 2026 by admin Leave a Comment


Swara Bhasker : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. अनेक मुद्द्यांवर स्वतःचं परखड मत मांडत अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली. आता देखील असंच काही झालं आहे, एका कार्यक्रमात स्वरा हिने ‘जौहर’वर मोठं वक्तव्य केलं. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात स्वरा हिने 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर ‘पाद्मावत’ सिनेमावर निशाणा साधला. या प्रकरणातील वाद आता राजकीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. राज्य मंत्री रघुराज सिंह यांनी स्वरा हिच्यावर संताप व्यक्त करत निशाणा साधला आहे. रघुराज सिंह संताप व्यक्त करत म्हणाले, स्वरा भास्कर हिने मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न करुन स्वतःच्या चारित्र्याला धक्का लावला आहे. त्यांनी म्हटलं की, त्या महिलेमध्ये चारित्र्य नावाची कोणती गोष्टच नाही. . रघुराज सिंह यांनी टिप्पणी केली की, एका मुस्लिम पुरुषाशी विवाह करून स्वरा भास्करने तिचे चारित्र्य मलीन केले. त्यांनी पुढे असेही म्हटले की, आपल्या मुलीने कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे, अशी तिच्या पूर्वजांची नक्कीच अपेक्षा असेल.

रघुराज सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य

मंत्री रघुराज सिंह यांनी स्वरा भास्कर हिचा उल्लेख आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. रघुराज सिंह येथेच थांबले नाहीत.रघुराज सिंह म्हणाले, ‘अशा महिला काहीही बोलू शकतात. स्वरा भास्कर हिंदुत्वासाठी अभिशाप आहेत. एवढंच नाही तर, तिच्याकडे चारित्र्य नावाची कोणती गोष्टच नाही. ‘, मात्र, हे सर्व आरोप आणि भाष्ये रघुराज सिंह यांच्या वैयक्तिक राजकीय प्रतिक्रिया आहेत

ज्या मुस्लीम व्यक्तीला राखी बांधायची, त्याच्याशीच लग्न – रघुराज सिंह

रघुराज सिंह यांनी अभिनेत्री स्वरा भास्करच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं की, तिने त्याच मुस्लिम व्यक्तीशी विवाह केला ज्याला ती एकेकाळी ‘राखी’ बांधत असे. अशी महिला हिंदुत्वासाठी एक शाप आहे, असंही त्यांनी नमूद केलं. रघुराज सिंह यांच्या या तीव्र प्रतिक्रियेनंतर, ‘जौहर’बाबत सुरू असलेला वाद आता राजकीय वळण घेताना दिसत आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

स्वरा भस्कर हिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

‘पद्मावत’ सिनेमातील ‘जौहर’च्या सीनबद्दल बोलताना स्वरा भास्कर म्हणाली, सिनेमा पाहिल्यानंतर तिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना एक खुलं पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये 800 महिलांच्या जौहरच्या सीनवर निशाणा साधला, या सीनची तुलना अभिनेत्रीने बलात्कार पीडितांसोबत केली आणि प्रश्न उपस्थित केला की, जर कोणत्या महिलेवर बलात्कार झाला असेल, तर तिचं आयुष्य संपायला पाहिजे? स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःला संपवणं किती योग्य आहे? बलात्कार होणं महिलेच्या आयुष्याचा अंत आहे का? असे प्रश्न स्वरा भास्कर हिने उपस्थित केले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सर्वात मोठा झटका ! सुभाष चंद्रा यांच्या विरोधात FIR, थेट सीबीआयची कारवाई; मोठ्या घोटाळ्याचा आरोप
  • राज साहेबांनी गोविंदा पथकांना… मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
  • केएल राहुल दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार नाही, झालं असं की…
  • Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
  • पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in