
दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेतील अंतिम सामना 6 सप्टेंबर रोजी ईस्ट झोन आणि साऊथ झोन यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी साउथ झोनचा कर्णधार तिलक वर्माने एक अपडेट दिली आहे. त्याने सांगितलं की, केएल राहुल दुलीप ट्रॉफी स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार नाही. (Photo PTI)
केएल राहुल खेळणार नाही ही बातमी कर्णधार तिलक वर्माने पत्रकार परिषदेत दिली. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीपूर्वी ही पत्रकार परिषद पार पडली. इतकंच काय तर देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद सिराज यांच्या खेळण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. (Photo PTI)
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद सिराजसह केएल राहुल खेळणार अशी बातमी होती. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळलेले तिन्ही खेळाडू साउथ झोनकडून खेळणार असं बोललं जात होते. पण आता केएल राहुल या यादीतून बाहेर गेला आहे. (Photo PTI)
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीबाबत साउथ झोनचा कर्णधार तिलक वर्माने सांगितलं की, संघात एका ऑफ स्पिनरसह उतरू शकतात. यासाठी ईस्ट झोनमध्ये सहभागी असलेल्या तीन लेफ्ट हॅडेड फलंदाज आहेत. (Photo PTI)
तिलक वर्माने सांगितलं की, टीम कॉम्बिनेशनवर शेवटचा निर्णय खेळपट्टी पाहिल्यानंतर घेतला जाईल. जर फिरकीपटूला प्लेइंग 11 मध्ये घ्यायचंच झालं तर तिरुपुराना विजय एक चांगला पर्याय ठरू शकतो. (Photo PTI)




Leave a Reply