
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होत आहेत. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीचं गणित यावर अवलंबून आहे. त्यामुळे दोन्ही सामन्यात विजय मिळण्याचा दबाव टीम इंडियावर असणार आहे. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह स्पर्धेला मुकला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज आकिब नबीला संघात स्थान दिलं गेलं आहे. रणजी ट्रॉफीत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे. पण त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार का? हा देखील प्रश्न आहे. श्रीलंकेत पहिला कसोटी सामना खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्याचं कारण काय ते समजून घेऊयात..
आकिब नबी डेब्यू करणार का?
आकिब नबीला संघात स्थान मिळालं, पण प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण आहे. कारण त्याला जसप्रीत बुमराह जखमी झाल्याने संघात स्थान मिळालं आहे. त्यामुळे निवडकर्त्यांची पहिली पसंती नव्हता. त्यामुळे टीम इंडिया कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत मोहम्मद सिराज आणि गुरनूर ब्रार यांना संधी देण्याची शक्यता अधिक आहे. कारण श्रीलंकेची खेळपट्टी ही फिरकीला मदत करणारी आहे. त्यामुळे फार तर दोन वेगवान गोलंदाजांसह शुबमन गिल मैदानात उतरेल. त्यामुळे आकिब नबीचा विचार होणं कठीण आहे. त्यामुळे पहिला वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, तर दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून गुरनूर ब्रार यांची निवड होईल.
AUQIB NABI IN INDIAN TEAM
Ranji 25-26: 60 Wkt | 12.56 Avg
VHT 25-26: 14 Wkt | 21.85 AvgAuqib Nabi has replaced Jasprit Bumrah for Sri Lanka test series
Auqib Nabi is th most deserving pacer for this spot
Welcome to Team India, Nabi
pic.twitter.com/qQRqkklJUe
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) August 3, 2026
गुरनूर ब्रार हा दुसरी पसंती असण्याचं कारण म्हणजे टीम इंडिया व्यवस्थापनाने त्याची पारख करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याला आतापर्यंत सहा वनडे सामन्यात संधी दिली गेली आहे. यासह प्रसिद्ध कृष्णाही संघात आहे. जर गुरनूर ब्रारला डावललं तर दुसरा पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. त्यामुळे आकिबचा नंबर लागणं कठीण आहे.
अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11 : शुबमन गिल, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मानव सुथार, सारांश जैन, कुलदीप यादव, गुरनूर ब्रार आणि मोहम्मद सिराज.
AUQIB NABI IN INDIAN TEAM 


Leave a Reply