• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Akshay Kumar : अक्षय कुमार कोणत्या धर्माला मानतो? उत्तराची होतेय चर्चा

June 24, 2026 by admin Leave a Comment


'बॉलिवूडचा खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'वेलकम टू जंगल' या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. येत्या 26 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय धर्माविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

'बॉलिवूडचा खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'वेलकम टू जंगल' या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. येत्या 26 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय धर्माविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.

तू कोणता धर्म मानतोस किंवा पाळतोस असा प्रश्न अक्षयला 'ब्रुट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला माझा हिंदू धर्मावर विश्वास आहे. कारण माझ्या आई-वडिलांनी मला तेच शिकवलं आहे. मी हिंदू धर्माचं पालन करतो परंतु मला तो कोणावर थोपवायचा नाहीये.

तू कोणता धर्म मानतोस किंवा पाळतोस, असा प्रश्न अक्षयला 'ब्रुट इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “माझा हिंदू धर्मावर विश्वास आहे. कारण माझ्या आई-वडिलांनी मला तेच शिकवलं आहे. मी हिंदू धर्माचं पालन करतो, परंतु मला तो कोणावर थोपवायचा नाहीये.”

सर्वांची आपली वैयक्तिक निवड असते. त्यामुळे मला कोणावरही धर्म थोपवायचा नाही असं तो पुढे म्हणाला. मात्र याआधी 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी अक्षयने धर्माबद्दल वेगळंच उत्तर दिलं होतं. मी कोणत्याच धर्माला मानत नाही कारण माझ्या मते एकच धर्म आहे तो म्हणजे भारतीय असं त्याने 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

सर्वांची आपली वैयक्तिक निवड असते. त्यामुळे मला कोणावरही धर्म थोपवायचा नाही”, असं तो पुढे म्हणाला. मात्र याआधी 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी अक्षयने धर्माबद्दल वेगळंच उत्तर दिलं होतं. “मी कोणत्याच धर्माला मानत नाही, कारण माझ्या मते एकच धर्म आहे, तो म्हणजे भारतीय”, असं त्याने 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

देवांवर अक्षयचा खूप विश्वास आहे आणि अनेकदा त्याने धार्मिक स्थळांनाही भेट दिली आहे. पण त्याचबरोबर त्याला भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे. म्हणूनच भारतीय असण्यालाच तो त्याचा पहिला धर्म मानतो. अक्षय कुमारने मुंबईतील हाजी अली दर्गा आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरांसह अनेक धार्मिक स्थळांच्या नूतनीकरण किंवा जीर्णोद्धारासाठी देणगी दिली आहे.

देवांवर अक्षयचा खूप विश्वास आहे आणि अनेकदा त्याने धार्मिक स्थळांनाही भेट दिली आहे. पण त्याचबरोबर त्याला भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे. म्हणूनच भारतीय असण्यालाच तो त्याचा पहिला धर्म मानतो. अक्षय कुमारने मुंबईतील हाजी अली दर्गा आणि अयोध्येतील श्रीराम मंदिरांसह अनेक धार्मिक स्थळांच्या नूतनीकरण किंवा जीर्णोद्धारासाठी देणगी दिली आहे.

अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 26 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला भाग 2007 मध्ये आणि दुसरा भाग 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस दिशा पटानी लारा दत्ता परेश रावल सुनील शेट्टी राजपाल यादव फरिदा जलाल आणि जॅकी श्रॉफ अशी मोठी स्टारकास्ट आहे.

अक्षय कुमारचा 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट 26 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा पहिला भाग 2007 मध्ये आणि दुसरा भाग 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षयसोबत जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, लारा दत्ता, परेश रावल, सुनील शेट्टी, राजपाल यादव, फरिदा जलाल आणि जॅकी श्रॉफ अशी मोठी स्टारकास्ट आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप
  • 33 वर्षानंतर श्रीलंकन खेळाडूचं नशिब निघालं फुटकं, कोलंबोत एकदा नाही तर दोनदा पायावर मारली कुऱ्हाड
  • CJP च्या बड्या नेत्यावर अचानक हल्ला, त्या मुक्या प्राण्यामुळे एकच खळबळ, घडलं तरी काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in