• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Akasa Air Flight : हवेतच अचानक विमानात इंधन कमी झालं, फ्लाइटमध्ये खळबळ उडाली, 194 प्रवाशांची धडधड वाढलेली पण..

May 28, 2026 by admin Leave a Comment


बंगळुरुहून भुवनेश्वरला जाणाऱ्या अकासा एअर लाईन्सच्या फ्लाइट QP 1503 विमानात बुधवारी रात्री अचानक इंधनाची पातळी घसरली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली होती. परिस्थिती पाहून एअर ट्रॅफिक कंट्रोल ATC ने इमर्जन्सी घोषित केली. नंतर सुदैवाने विमानांच सुरक्षित लँडिंग झाल्याने मोठी दुर्घटना टळली. अकासा एअर लाइन्सच्या बोइंग 737 MAX 8 विमानात ही घटना घडली. विमानात त्यावेळी 194 प्रवासी होते. भुवनेश्वरमध्ये खराब हवामान असल्यामुळे रात्री 8.40 च्या सुमारास अकासा एअर लाइन्सच विमान लखनऊ एअरपोर्टच्या दिशेने वळवण्यात आलं. त्यावेळी विमानातील इंधन कमी होऊ लागलं. स्थिती गंभीर होत असल्याचं पाहून पायलटने PAN PAN चा कॉल दिला. ATC ने प्राथमिकतेच्या आधारावर क्लियरन्स मागितलं. विमानाला एकाच प्रयत्नात लँडिंगची परवानगी द्यावी म्हणून पायलटने विनंती केली. जेणेकरुन विमानात कमी इंधन असताना सुरक्षित लँडिंग करता येईल.

पायलटने विमानात कमी इंधन असल्याचं सांगितल्यानंतर रात्री 9:02 मिनिटांनी एटीसीने फुल इमर्जन्सी घोषित केली. त्यानंतर एअरपोर्टवर तात्काळ इमर्जन्सी प्रोटोकॉल लागू करण्यात आले. कुठल्याही अप्रिय घटनेचा सामना करण्यासाठी रात्री 9:04 वाजता रनवेच्या आसपास क्रॅश फायर टेंडर आणि इमर्जन्सी टीम्स तैनात करण्यात आल्या.

रात्री 9.30 इमर्जन्सी हटवण्यात आली

लँडिंगनंतर एक मिनिटाने पायलटने एटीसीला सूचना दिली की, सर्व ऑपरेशन सामान्य असून कुठल्याही अतिरिक्त मदतीची आवश्यकता नाही. त्यानंतर विमानाला टँक्सी करुन बे-10 जवळ पोहोचवण्यात आलं. रात्री 9.29 वाजता विमान पार्क करण्यात आलं. स्थिती सामान्य झाल्यानंतर रात्री 9.30 इमर्जन्सी हटवण्यात आली.

तीन प्रवाशांनी लखनऊमध्ये विमान सोडून दिलं

अकासा एअरलाइन्सच्या विमानाने रात्री 9:21 वाजता धावपट्टी 09 वर सुरक्षित लँडिंग केलं. या संपूर्ण काळात सुरक्षा निकष आणि इमर्जन्सी प्रक्रियांचं पालन करण्यात आलं, असं एअरपोर्ट अधिकाऱ्यांनी सांगितलं. कुठल्याही प्रकारची दुर्घटना किंवा नुकसान झालं नाही. विमानाने लँडिंग केल्यानंतर तीन प्रवाशांनी लखनऊमध्ये विमान सोडून दिलं. तेच विमान रात्री भुवनेश्वरला रवाना करण्याची तयारी सुरु होती. मागच्यावर्षी अहमदाबाद विमानतळावर मोठी विमान दुर्घटना घडली होती. यात फक्त एक प्रवासी वाचला होता.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in