• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ajinkya Rahane: बाब्बो! विराट खूपच आक्रमक… निवृत्त होताच अजिंक्य रहाणे काय बोलून गेला? वाचाच…

August 6, 2026 by admin Leave a Comment

अजिंक्य रहाणेने नुकतीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर आता त्याने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने भारतीय क्रिकेट संघाबद्दल मनमोकळेपणाने आपले मत व्यक्त केले आहे. त्याने टीम इंडिया, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दल आणि सध्या गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली खेळण्याबद्दल आपले विचार मांडले. तो सध्या यूकेमध्ये ‘हंड्रेड लीग’मध्ये समालोचन करत आहे. त्याने ‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टवर मायकल वॉन, अॅलिस्टर कूक, फिल टफनेल आणि डेव्हिड लॉईड यांसारख्या दिग्गजांशी संवाद साधला. या दरम्यान आता अजिंक्यने विराट कोहलीच्या कसोटी कर्णधारपदाबाबत एक विधान केले आहे.

रहाणेने स्पष्ट केले की, माझे विराट कोहलीसोबत सकारात्मक आणि मोकळे संवाद होत असत, ज्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये आमच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. जेव्हा जेव्हा मी कोहलीसोबत फलंदाजी करायचो, तेव्हा मी सर्वोत्तम कामगिरी करायचा. विराटचा दृष्टिकोन आक्रमक होता आणि माझा शांत स्वभाव दोघांसाठीही उपयुक्त ठरला. विराट नेहमी मला आक्रमक खेळण्यासाठी प्रोत्साहित करायचा आणि म्हणायचा की, जर पहिला चेंडू फटका मारण्यासारखा असेल, तर मी तसे करावे आणि तो मला पाठिंबा देईल.”

“Virat and Ravi toughened up Indian cricket.” 💪

Who has brought character to the Indian dressing room? 🇮🇳

[@ajinkyarahane88] pic.twitter.com/Bt7Z26xGy5

— Stick to Cricket (@StickToCricket) August 5, 2026

रहाणेने 85 कसोटी सामन्यांमध्ये 12 शतकांसह 5077 धावा केल्या आहेत. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने एकही कसोटी सामना गमावला नाही. 2020-21 मध्ये, जेव्हा कोविड-19 महामारीच्या काळात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला, तेव्हा रहाणेने संघाला विजय मिळवून दिला. ॲडलेडमध्ये भारताचा संघ 36 धावांवर सर्वबाद झाला. महामारीच्या प्रादुर्भावामुळे पहिल्या कसोटीनंतर कोहली भारतात परतला. त्यानंतर रहाणेने संघाची सूत्रे हाती घेतली आणि भारताला 2-1 असा विजय मिळवून दिला.

रहाणे म्हणतो की, 2014 मध्ये जेव्हा महेंद्रसिंग धोनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला, तेव्हा विराट कोहली आणि रवी शास्त्री या जोडीने सूत्रे हाती घेतली. त्यांनी भारतीय क्रिकेटला मजबूत केले. परदेशात खेळताना त्यांनी आक्रमक आणि धाडसी क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. अजिंक्य रहाणेंनी बराच काळ संघात पुनरागमन होईल अशी वाट पाहिल्यानंतर अखेर निवृत्तीची घोषणा केली.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?
  • नवरा नक्को गं बाई! तरुण पोरी लिव्ह इनच्या प्रेमात, लग्न म्हटलं की…धक्कादायक आकडेवारी समोर!
  • ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका ! 28 ऑगस्टपासून बदलणार लेट फी आणि रिवॉर्ड पॉईंट्सचे नियम
  • हॉटेलमध्ये तीन तरुणींसोबत काँग्रेसचा नेता पकडला, अय्याशी करतानाच…
  • पुढील 72 तास धोक्याचे… राज्याच्या या भागाला पावसाचा अलर्ट; विदर्भ, मराठवाडा…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in