• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

9 पेग रिचवून नशेत लिहीली ही अजरामर गझल, 44 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही बेस्ट प्रेमगीत

July 8, 2026 by admin Leave a Comment


काही गाणी अशी असतात… जी फक्त कानांनी ऐकली जात नाहीत, तर ती मनात कायमची घर करून राहतात. त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर आणि प्रत्येक भावना आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. असंच एकच अजरामर गाणं.. खरंतर गाणं नव्हे ती आहे एक गझल.. अशीच एक अजरामर गझल कोणाच्याही कानावर पडली, तरी ते लगेच गुणगुणू लागता. 44 वर्षांपूर्वी आलेली ही गझल, आजही बेस्ट प्रेमगीत मानलं जातं. विख्यात लेखक, गीतकार, जावेद अख्तर यांनीच ही गझल लिहीली होती, 1982 साली आलेल्या ‘साथ साथ’ लचित्रपटाचा ती अविभाज्य भाग बनली आणि प्रचंड गाजली. अभिनेते फारूख शेख आणि दीप्ती नवल यांच्यावर ही गझल किंवा हे गीत चित्रित करण्यात आसं. या गीताचे बोल, त्याच्या व्हिडीओ, संगीत… सगळं एकाहून एका शानदार आणि सुंदर पद्धतीने जुळून आलं. मात्र हे गीत लिहीताना घडलेला खास किस्सा जावेद अख्तर यांनी त्यांच्याच शैलीत सांगितला होता. चला, जाणून घेऊ.ा

दारूच्या नशेत लिहीलं हे रोमँटिंक गीत

सुरूवातीलाच जे एवढं रसभरीत वर् केलं, ते गाणं अखेर कोणतं याची अनेकांना उत्सुकता असेल, तर वरच्या ओळी वाचून काहींनी ते गीत ओळखलही असेल कदाचित. आज आपण ज्या गीताबद्दल , ती म्हणजे ‘तुमको देखा तो ये खयाल आया’, ही विख्यात गझल आहे. ‘साथ साथ’मध्ये फारूख शेख आणि दीप्ती नवल यांच्यावर चित्रित केलेलं हे गाणं आजही अनेकांना तोंडपाठ असेल. याच चाल आणि बोल एवढे सुंदर पण सोपे आहेत की ते आपण कधी गुणगुणायला लागतो, ते कळतच नाही. अतिशय सुंदर अशा या गाण्याने प्रेमाची एक वेगळीच व्याख्या जगासमोर मांडली.

या गाण्याबद्दल जावेद अख्तर यांनी जो किस्सा सांगितला, तो मात्र एकदम अचंबित करणारा आहे. खरंतर जावेद अख्तर यांनी ही गझल दारूच्या नशेत लिहीली होती.. हो, हे खरं आहे.. ही गोष्ट स्वतः जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमात सांगितली होती. ते म्हणाले, ‘सिलसिला’ चित्रपटानंतर यश चोप्रा यांचा एक असिस्टंट डायरेक्टर माझ्याकडे आला होता. त्याला आपल्या चित्रपटासाठी एक गाणे हवे होते. चित्रपटाचे बजेट मोठं नव्हते, पण मी त्याच्यासाठी गाणं लिहिण्यास होकार दिला, असं जवेद अख्तर म्हणाले.

8-9 पेग पिऊन लिहीली गझल

‘ मात्र त्या काळात मला दारूचं व्यसन होतं. तो असिस्टंट डायरेक्टर रोज माझ्याकडे यायचा आणि गाण्याबद्दल आठवण करून द्यायचा. पण दिवसामागून दिवस जात होते… रात्रीच्या गप्पा रंगायच्या, दारू प्यायचे आणि गाणे मात्र पुढे ढकललं जायचं, असं जावेद अख्तर म्हणाले. अखेर एक दिवस रात्रीचे दोन वाजले होते. मी तब्बल 8 ते 9 पेग प्यायले होते. तेवढ्यात त्या असिस्टंट डायरेक्टरने पुन्हा गाण्याबद्दल विचारलं. त्याला शेवटची ट्रेन पकडायची होती… तो वारंवार घड्याळाकडे पाहत होता. तेव्हा मी त्याच्याकडे कागद आणि पेन मागितलं आणि 9 मिनिटांत ते गाणं झरझर कागदावर उतरवून त्याच्याकडे सोपवलं’, असं ते म्हणाले.

मात्र त्यानंतर जे घडलं ते इतिहास बनलं. अवघ्या 9 मिनिटांत जावेद “तुमको देखा तो ये खयाल आया…” ही अजरामर गझल लिहून पूर्ण केली. नंतर महान गायक जगजीत सिंह यांच्या आवाजात सुरबद्ध झालेल्या या गझलेला अशी जादू मिळाली की ती आजही प्रत्येक प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या मनाला भिडते. तुम्हालाही आवडतं का हे गीत ?



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…
  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?
  • CJP आंदोलनात बेधडक पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रियाचं भवितव्य जनतेच्या हातात, सलमान खानने घेतला पुढाकार
  • मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in