• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तो त्याच लायकीचा; आरोपीच्या आईचा मृतदेह स्वीकारण्यास नकार, अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात एन्काऊंटर

July 8, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम बंगालमधील कोलकात्याजवळ असलेल्या बारुईपूर इथल्या एका तलावात 12 वर्षीय मुलीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. संबंधित मुलीवर अत्याचार केल्यानंतर ती जिवंत असतानाच तिला गोणीत भरलं आणि तलावात फेकून दिल्याची मन हेलावून टाकणारी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली होती. पाण्यात बुडून, श्वास गुदमरून तिला मृत्यू झाला होता. या घटनेतील मुख्य आरोपी प्रभाष मंडल याचा बुधवारी पहाटे पोलिसांनी एन्काऊंटर केला. या एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला असून आरोपीच्या आईने मुलाचा मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्याने जे केलंय, त्यासाठी त्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे होती, असं आरोपीच्या आईने म्हटलंय.

आरोपीच्या आईचा मृतदेह स्वीकारण्यास नकार

माध्यमांशी बोलताना आरोपीच्या आईने म्हटलंय, “दोन पोलीस अधिकारी माझ्या घरी आले होते. मी तेव्हाच झोपून उठले होते. त्यांनी मला सांगितलं की, माझ्या मुलाचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. त्यांनी मला विचारलं की, तुम्हाला रुग्णालयात जायचं आहे का? त्यावर मी त्यांना सांगितलं की, माझे पती आजारी आहेत, त्यामुळे मी जाऊ शकत नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की, तुम्हाला जे वाटतं ते करा, मला काहीच समस्या नाही. माझ्या मुलाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. मी त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही. त्याने कधीच काही चांगलं काम केलं नव्हतं. त्याने खूप चुकीचं केलं होतं आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली. त्याला मारून टाका किंवा काहीही करा, माझा काहीच आक्षेप नाही. पण मी त्याला मृतदेह स्वीकारणार नाही.”

नागरिकांमध्ये रोष

बुधवारी पहाटे आरोपी प्रभाष मंडल याला पोलीस गुन्ह्याचं रिक्रिएशन करण्यासाठी घटनास्थळी नेत असताना त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. त्याचवेळी आरोपीने पोलिसाकडून शस्त्र हिसकावून घेण्याचा आणि त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यात आरोपी गंभीर जखमी झाला. रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

12 वर्षीय मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी बारुईपूरमधील नागरिक संतप्त झाले होते. संतप्त झालेल्या नागरिकांनी बलात्काराच्या आणि हत्येच्या आरोपाखाली एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. पीडित मुलगी शनिवारी तिच्या मैत्रिणीसाठी भेटवस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडली होती, मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांना पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर रविवारी, सूर्यपूर हाट परिसरातील एका तलावात तिचा मृतदेह सापडला. तिच्या डोक्यावर जखमा होत्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
  • Kareena Kapoor-Saif Ali Khan : करीनाने सैफचा बीचवरचा फोटो शेअर करताना म्हटलं हॉट नवरा, नेटीझन्सनी लगेच तिला विचारलं की..
  • Mumbai to Pune railway updates : आनंदाची बातमी, लोणावळ्यात रेल्वे ट्रक दुरुस्ती वेगाने, एका मार्गिकेवरुन पहिली ट्रेन रवाना…
  • मोठी बातमी! मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत…
  • Gautam Gambhir : संजू सॅमसन फ्लॉप म्हणून त्याला बसवलं, मग आता कोच गंभीर अजून दोघांच्या बाबतीत असा निर्णय कधी घेणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in