• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

61 वर्षीय आमिरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल 33 वर्षीय मुलाची अशी प्रतिक्रिया; कमेंट्सचा पाऊस

July 5, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान लवकरच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. येत्या 5 जुलै रोजी घरात छोटेखानी समारंभ पार पडणार आहे. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबतच्या या लग्नाबद्दल खुद्द आमिरने माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी, त्याचा आणि पहिली पूर्व पत्नी रिना दत्ताचा मुलगा जुनैद खानसुद्धा त्याच्या बाजूलाच उपस्थित होता. 61 वर्षीय आमिर त्याच्या तिसऱ्या लग्नाविषयी बोलताना बाजूला उभ्या असलेल्या जुनैद खानच्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जुनैद हा आमिर आणि त्याची पहिली पूर्व पत्नी रिना दत्ता यांचा मोठा मुलगा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय.

मुंबईतील एका कार्यक्रमात आमिर त्याच्या मुलासोबत पोहोचला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना त्याने सांगितलं, “होय, 5 जुलै रोजी माझं लग्न होत आहे. हा छोटेखानी समारंभ असेल आणि घरीच तो पार पडणार आहे. यावेळी दोघांचेही कुटुंबीय उपस्थित असतील. 5 जुलै आमच्यासाठी खूपच खास दिवस आहे. दोघांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि घरातच छोटासा कार्यक्रम होणार आहे. तुम्हा सगळ्यांच्या दुआं (आशीर्वाद) आम्हाला हवे आहेत. आम्ही खुश राहो, यासाठी सर्वांनी प्रार्थना करा आणि आशीर्वाद द्या.” हे सर्व सांगताना आमिरच्या बाजूलाच उभा असलेला जुनैद हसताना आणि आनंद व्यक्त करताना दिसतोय.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आमिरच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी वयाच्या 61 व्या वर्षी तिसऱ्या लग्नावरून मिश्किल टिप्पण्याही केल्या आहेत. ‘आमचा आशीर्वाद तर असेलच, पण तुम्ही पुन्हा विभक्त होऊ नका’, असा टोला एकाने लगावला. तर ’30 वर्षांच्या मुलासमोर तिसऱ्या लग्नाची घोषणा.. पुढच्या पिढीला बॉलिवूड काय शिकवतंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘हा माणूस खरंच आयुष्य एंजॉय करतोय’, असेही कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

आमिर खानने त्याच्या 60 व्या वाढदिवशी गौरी स्प्रॅटसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. आमिरने याआधी रिना दत्ता आणि किरण राव यांच्याशी लग्न केलं होतं. रिना दत्तापासून आमिरला जुनैद आणि आयरा ही दोन मुलं आहेत. तर किरण राव आणि आमिर यांना आझाद हा 14 वर्षांचा मुलगा आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in