• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा असलेला ‘हा’ 5G फोन आता नव्या व्हेरिएंटमध्ये, जाणून घ्या किंमत

June 16, 2026 by admin Leave a Comment


HMD ने गेल्या महिन्यात भारतात त्यांचा नवीन व्हायब सिरीजचा स्मार्टफोन HMD Vibe 2 5G फोन लाँच केला होता. तर लाँच दरम्यान कंपनीने हा फोन 4जीबी + 64जीबी आणि 4जीबी + 128जीबी या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून दिला होता. हा फोन भारतात 26 मे रोजी विक्रीसाठी उपलब्ध झाला. दरम्यान आज कंपनीने या फोनचा 6जीबी + 128जीबी स्टोरेज असलेला एक नवीन व्हेरिएंट भारतात लाँच केला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या फोनला मिळालेल्या प्रचंड मागणीचा प्रतिसाद म्हणून हा व्हेरिएंट सादर करण्यात आला आहे. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

HMD Vibe 2 5G किंमत आणि उपलब्धता

HMD Vibe 2 5G च्या या नवीन 6जीबी + 128जीबी व्हेरिएंटची विक्री उद्या 16 जून 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता सुरू होईल. तर या फोनची मूळ किंमत 16 हजार 999 रूपये आहे, मात्र बँक ऑफरमुळे तुम्ही उद्या हा फोन फक्त 14 हजार 999 रूपये या विशेष लाँच किमतीत खरेदी करू शकता. कंपनीच्या म्हणण्यानुसार 4जीबी+128जीबी व्हेरिएंट 12 हजार 999 रूपयांमध्ये खरेदी करू शकता.

HMD Vibe 2 5G ची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास या फोनमध्ये 6.67-इंचाचा HD+ 120Hz LCD डिस्प्ले आहे. यात 2.3GHz पर्यंत क्लॉक केलेला Unisoc T8200 6nm प्रोसेसर आणि Mali-G57 MC2 GPU आहे. हा फोन 4GB/6GB LPDDR4x रॅम आणि 64GB/128GB स्टोरेजच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

HMD Vibe 2 5G कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा, एक सेकंडरी कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश आहे. समोरच्या बाजूला, सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या डिव्हाइसमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5 मिमी ऑडिओ जॅक, खालच्या बाजूला असलेला स्पीकर आणि धूळ व पाण्यापासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग देखील आहे.

तसेच या फोनच्या कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G SA/NSA (n1/3/5/8/28/40/77/78 बँड्स), ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5.0, GPS + GLONASS आणि एक USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. या फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 6000mAh क्षमतेची बॅटरी देखील आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
  • Nepal Floods : शौचालयासाठी खड्डा खणत होता, तितक्यात पुराने त्याला गिळलचं होतं, पण..देव तारी त्याला कोण मारी
  • Abhijeet Dipke: आता तुझी पाळी आहे, तयारीत राहा…अभिजीत दिपके यांनी कोणाला दिली वॉर्निंग?
  • MPSC पेपरफुटीवरून राजकारण पेटलं; भाजप नेत्याचं थेट रोहित पवारांना ओपन चॅलेंज, म्हणाले, ‘हिंमत असेल तर….’
  • मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in