• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

’60-70 कैद्यांसोबत एकाच खोलीत…’, सलमान खानने सांगितले तुरुंगातील वास्तव, सोहेल खान भावूक

August 3, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान नुकताच प्राइम व्हिडिओवरील रिअॅलिटी शो ‘अलायन्स’मध्ये विशेष पाहुणा म्हणून सहभागी झाला. या शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या आपल्या धाकट्या भावाला अभिनेता सोहेल खानला पाठिंबा देण्यासाठी आला होता. सलमानची अनपेक्षित एन्ट्री पाहून शोमधील इतर स्पर्धक आश्चर्यचकित झाले. मात्र, या भेटीदरम्यान सलमानने केवळ सोहेलला प्रोत्साहनच दिले नाही तर आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाची आठवणही सर्वांसमोर मांडली.

शोमध्ये संवाद साधताना सलमान खानने 1998 मधील काळवीट आणि चिंकारा शिकार प्रकरणानंतर तुरुंगात घालवलेल्या दिवसांविषयी सांगितले. त्या काळातील परिस्थिती किती कठीण होती, याचे भावनिक वर्णन त्याने केले. तो म्हणाला की, ‘खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी तुरुंगात गेलो होतो, तेव्हा समोर फक्त लोखंडी गज दिसायचे. अतिशय लहान जागेत तब्बल 50 ते 70 कैदी राहत होते. संपूर्ण बॅरकमध्ये फक्त एकच भारतीय शैलीतील शौचालय होते. सर्वत्र पाल फिरायच्या आणि परिस्थिती अत्यंत अस्वच्छ होती.’

जेलमधील 18 दिवस

सलमानच्या या अनुभवांबद्दल ऐकताना शोमधील स्पर्धक आणि त्याचा भाऊ सोहेल खान भावूक झाले. काही क्षण संपूर्ण वातावरण शांत झाले होते. सलमानच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाची माहिती ऐकून उपस्थितांनाही धक्का बसला.

सलमान खान याला 1998 मधील काळवीट आणि चिंकारा शिकार प्रकरणात अटक झाली होती. या प्रकरणात त्याने पोलिस कोठडी आणि तुरुंगात मिळून सुमारे 18 दिवस घालवले होते. यापूर्वी एका दूरचित्रवाणी मुलाखतीतही त्याने तुरुंगातील अनुभव सांगताना, ‘तुरुंगात सर्वात मोठी अडचण बाथरूमची होती. त्याशिवाय मी शांत राहायचो, कारण मी कोणतेही चुकीचे कृत्य केले नसल्याची माझी भावना होती असे त्याने म्हटले होते.

भावाला पाहताच सोहेल खान भावूक

दरम्यान, ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन अभिनेता कुणाल खेमू करत आहे. या शोमध्ये चित्रपट, दूरदर्शन, डिजिटल माध्यम आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध आव्हानांचा सामना करताना दिसतात. स्पर्धकांना एकमेकांसोबत युती करून खेळ पुढे न्यावा लागतो ही या शोची खास संकल्पना आहे.

Sohail Khan & all the housemates are visibly emotional as #SalmanKhan opens up about the hardships & difficult moments he went through during his time in jail. The way Bhai describes everything is deeply moving, leaving everyone emotional & silent #Alliance…

— Sohail. (@BeingSohail__) August 3, 2026

सलमान खानच्या उपस्थितीमुळे शोला विशेष रंगत आली. भावाला पाहताच सोहेल खान भावूक झाला आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारत प्रेम व्यक्त केले. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • सीजेपीची मोठी घोषणा! येत्या 5 सप्टेंबरला थेट दिल्लीत…केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं!
  • पती अन् सासूने टॉयलेट क्लीनर पाजल्याचा आरोप अन् व्हेंटिलेटरवर झुंज, विवाहीतेचा अखेर मृत्यू
  • रुपाली चाकणकरांच्या बदनामीवरून मोठी कारवाई; सुषमा आंधारेंसह 19 जणांवर गुन्हा दाखल! लवकरच…
  • Sugar Price Today : दिवाळीपर्यत साखरेचे दर शंभरी ओलांडणार? सरकारचा मोठा निर्णय…
  • शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in