• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

400 वर्षांपूर्वीचे हे भजन, री-क्रिएट होताच बनलं अमिताभ यांचं सर्वात लोकप्रिय गाणं, तुम्ही ऐकलंय का ?

September 1, 2026 by admin Leave a Comment


जेव्हा जेव्हा कृष्णभक्तीच्या गीतांचा विषय निघतो, तेव्हा मीराबाईंच्या भजनांचा उल्लेख आवर्जून केला जातो. श्रीकृष्णाविषयी त्यांची भक्ती आणि समर्पण आजही लोकांना भावूक करतं. मीराबाईंनी आपलं आराध्य असलेल्या श्रीकृष्णाला समर्पित अनेक भजनं रचली, जी शेकडो वर्षांनंतरही भक्तांच्या ओठांवर असतात, अनेक जण ती म्हणतात देखील. यापैकीच एक प्रसिद्ध भजन म्हणजे ‘पग घुंघरू बांध मीरा नाची रे’. सुमारे 400 वर्षं जुनं असलेल्या या भजनात मीराबाईंची श्रीकृष्णावरील मोठी भक्ती दिसून येते, ज्यामध्ये त्यांना जगाची कोणतीही पर्वा नाही. या भजनाच्या शब्दांत प्रेम, भक्ती, समर्पण आणि समाजाची पर्वा न करण्याची भावना स्पष्टपणे दिसते.

भजनात लपलाय मोठा भाव

‘पग घुंघरू बांध मीरा नाची रे’ हे भजन मीराबाईंच्या कृष्णभक्तीशी निगडीत आहे. भजनाच्या सुरुवातीच्या ओळींमध्ये मीरा आपल्या पायात घुंगरू बांधून श्रीकृष्णाच्या प्रेमा नाचण्याचा उल्लेख करते. त्यांच्यासाठी कृष्ण हा फक्त देव नाही तर, तर ते त्यांचे प्रियतम आणि जीवनातील सर्वात मोठा आधार होता.

या भजनातून मीराबाईंच्या त्या बेधडक आणि निस्सीम भक्तीची झलक दिसते. समाज काय म्हणले याची त्यांना त्यात बिलकूल चिंता नाही. त्यांची कृष्णभक्ती पाहून काही लोकांनी त्यांना वेडीही म्हटलं, पण मीराबाई आपल्या मार्गावरून कधीच हटल्या नाहीत.

बॉलिवूडनेही मीराबाईंच्या भजनातून घेतली प्रेरणा

मीराबाईंच्या भक्तीशी निगडीत या भजनाच्या प्रसिद्ध बोलांना कित्येक वर्षांनी, बॉलिवूडमध्ये एक नवं रूप मिळालं. 1982 साली प्रदर्शित झालेला ‘नमक हलाल’ हा चित्रपट सर्वांनाच आठवत असेल. याच चित्रपटात एक अतिशय लोकप्रिय गाणं होते, ते म्हणजे ‘पग घुंघरू बांध मीरा नाची थी’. या गाण्याची सुरूवातीची ओळ याच पारंपरिक भक्तिभावनेतून प्रेरित असल्याचं मानलं जातं. ‘नमक हलाल’ या चित्रपटासाठी गीतकार अनजान यांनी एका वेगळ्या अंदाजात हे गीत लिहीलं. तर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी आपल्या दमदार आवाजात ते गीत सादर केलं.

विशेष म्हणजे या गाण्यात अमिताभ बच्चन (Amitabbh Bachchan) यांचा खास अंदाज पाहायला मिळाला, तर त्यांच्यासोबत अभिनेत्री स्मिता पाटीलही दिसल्या. या गाण्याला बप्पी लाहिरी यांनी संगीत दिलं होतं. चित्रपटातील हे गाणं त्याच्या अतइशय वेगळ्या अंदाजामुळे अत्यंत लोकप्रिय झालं; मात्र त्याची मुळं ही मीराबाईंच्या शेकडो वर्षे जुन्या कृष्णभक्तीत रुजलेली आहेत. म्हणूनच जन्माष्टमीसारख्या विशेष प्रसंगी आजही मीराबाईंच्या भजनांची आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या गीतांची धून ऐकायला मिळते.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांनो सावध व्हा! दुष्काळाचं महासंकट घोंगावतंय, हवामानाच्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
  • आमच्या आंतरवालीत रक्ताचा चिखल केला होता… जरांगे पाटील भावुक, आंदोलनस्थळी नेमकं काय घडलं?
  • Vidyananda Bapat : डीजेला विरोध करणारे पुण्यातील विद्यानंद बापट नेमके कोण? काम काय करतात? शिक्षण वाचून चकित व्हाल!
  • महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात अनुकंपा धोरण लागू , सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदारांना नोकरी
  • 2 September 2026 Horoscope : तुमचं आयुष्य बदलून जाणार, 2 सप्टेंबरला या राशींसोबत होणार चमत्कार!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in