
मेटा कंपनीचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग अब्जाधीश आहे. मेटा कंपनीचे फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. या तिन्ही प्लॅटफॉर्मचा जगभरातील अब्जो लोक रोज वापर करतात. दरम्यान, संपूर्ण जग ज्याच्यामुळे जोडलं गेलं, तो मार्क झुकरबर्गकडे आज पैशांची कमी नाही.
त्याची जवनशैली पाहून अनेजकण थक्क होतात. दरम्यान, आता याच झुकरबर्गने एक 200 वर्षे जुना किल्ला खरेदी केला आहे. या किल्ल्याचा रॉयल लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मेटाचे CEO आणि अब्जाधीश मार्क झुकरबर्ग व त्यांची पत्नी प्रिसिला चॅन यांनी आयर्लंडमधील वॉटरफोर्ड येथे ‘स्ट्रॅनकली कॅसल’ खरेदी केला आहे. ब्लॅकवॉटर नदीच्या काठावर तब्बल 440 एकर परिसरात हा किल्ला पसरलेला आहे.
सुमारे 16000 चौरस फुटांच्या या किल्ल्यात 11 बेडरूम असून तो 1830 च्या दशकातील आहे. या मालमत्तेची किंमत अंदाजे 20 ते 30 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 200 ते 300 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
या किल्ल्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्याची आकर्षक ‘गॉथिक रिव्हायव्हल’ वास्तुशैली आहे. कोरीव दगड आणि भव्य रचना या शैलीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. 19 व्या शतकापासून ही वास्तुशैली श्रीमंत कुटुंबे आणि राजघराण्यांमध्ये लोकप्रिय राहिली आहे. मार्क झुकरबर्गच्या या नव्या घराची सगळीकडे चर्चा होत आहे.




Leave a Reply