• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित

September 2, 2026 by admin Leave a Comment


मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेल व खाद्य आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळल्यानंतर दोन आस्थापनांचे अन्न परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत, तर अन्य दोन आस्थापनांवर परवाना निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

FDA ने गोरेगाव येथील ईटक्लब ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कुर्ला येथील राणी क्रिएटर्स कन्सल्टंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांचे अन्न परवाने तातडीने निलंबित केले आहेत. तर चेंबूर येथील गुडलक बेकरी अँड स्टोअर्स आणि अशफाक बेकरी येथेही स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले. त्यामुळे या दोन्ही आस्थापनांविरोधात परवाना निलंबित करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

गोरेगावच्या आस्थापनात गंभीर त्रुटी

गोरेगावमधील ईटक्लब ब्रँड्सची तपासणी केली असता अन्नपदार्थ, रसायने आणि कर्मचाऱ्यांच्या वस्तूंची अयोग्य पद्धतीने साठवणूक केल्याचे आढळले. तसेच कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक स्वच्छतेच्या सुविधा अपुऱ्या असल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय परवान्यात नमूद नसलेल्या आईस्क्रीम आणि कार्बोनेटेड पेयांची विक्री केली जात असल्याचे तपासणीदरम्यान समोर आले. या गंभीर त्रुटींमुळे FDAने संबंधित आस्थापनाचा अन्न परवाना निलंबित केला आहे.

कुर्ल्यात उंदीर आणि अळ्यांचा प्रादुर्भाव

कुर्ल्यातील राणी क्रिएटर्स कन्सल्टंट अँड सर्व्हिस प्रोव्हायडर्स येथे तपासणीदरम्यान आणखी गंभीर बाबी समोर आल्या. आस्थापनात उंदीर आणि अळ्यांचा प्रादुर्भाव असल्याचे आढळले. तसेच परिसरात तेलकटपणा, साचलेले पाणी आणि अस्वच्छता दिसून आली. अन्नपदार्थ झाकण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचेही तपासणीमध्ये आढळले. याशिवाय टाकाऊ पदार्थांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्याचेही निदर्शनास आले.

वरील सर्व बाबी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन मानल्या जात असल्याने FDAने संबंधित आस्थापनावर कठोर कारवाई केली आहे. FDAच्या या कारवाईमुळे मुंबईतील हॉटेल आणि खाद्य आस्थापनांनी अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि परवान्याशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in