• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

4 हजार कोटी रुपयांच्या ‘रामायण’ सिनेमात काय खास? भावूक करणारा ‘हा’ सीन, रावणानंतर हनुमानाची भव्य एन्ट्री अन्…

July 19, 2026 by admin Leave a Comment


देशाची राजधानी दिल्ली येथे दिग्दर्शक नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: पार्ट 1’ सिनेमाचा भव्य ट्रेलर लॉन्च कार्यक्रम पार पडला. गेल्या अनेक महिन्यांपासून ‘रामायण: पार्ट 1’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमाचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावल लीक झाले. आता निर्मात्यांनी सिनेमाबद्दल मोठी घोषणा केली आहे. ट्रेलर लॉन्च कार्यक्रम पार पडल्यानंतर 24 जुलै रोजी सिनेमाचा ट्रेलर जगभरात प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘रामायण: पार्ट 1’ सिनेमाची चर्चाच रंगली आहे.

ट्रेलरमध्ये दिसला भल्य व्हिज्यूअल्सचा जलवा…

ट्रेलरची सुरुवात रावणाने होते. त्यानंतर हनुमानाच्या भूमिकेत असलेल्या यश याच्या दमदार एन्ट्रीने सर्वच चकित होतात. अभिनेता रणबीर कपूर याची श्रीरामाची भूमिका आणि अभिनेत्री साई पल्लवी हिची माता सिता यांच्या रुपातील एक झलक पाहायला मिळते. एवढंच नाही तर, जटायूचा असलेला प्रसंग भावूक आणि रोमांचक आहे. त्याचबरोबर, कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता आणि शूर्पणखेच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंग यांनीही प्रभावी अभिनय केला आहे. लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या रवी दुबेने आपल्या रागाचे दर्शन आणि भावपूर्ण अभिनयातून एक वेगळी छाप पाडली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर, सई पल्लवीच्या हिंदी भाषेतील कौशल्याबाबतच्या शंकाही बऱ्याच अंशी दूर झाल्याचं दिसून येत आहे.

काय म्हणाला यश?

कार्यक्रमात पोहोचलेला यश म्हणाला, ‘रामायण’ फक्त एक सिनेमा नाही तर, सर्व भारतीयांचं एक स्वप्न आहे. निर्मात्यांचे आभार मानत यश म्हणाला, ‘सिनेमामुळे मला हिंदी शिकण्याची संधी मिळाली. श्रीराम यांची कथा संपूर्ण जगासमोर पोहोचली पाहिजे, हाच एक संपू्र्ण टीमचा हेतू आहे.’

सनी देओल म्हणाला, ‘प्रत्येक भारतीय नागरिकाने ‘रामायण’ पाहायला हवा…’

सिनेमात सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहे. अभिनेता म्हणाला, ‘सिनेमातील माझी भूमिका फार मोठी नाही. पण हनुमान साकारण्याचं भाग्य मला मिळालं म्हणून मी आनंदी आहे… प्रत्येक भारतीय नागरिकाने ‘रामायण’ पाहायला हवा.’ असं देखील सनी देओल म्हणाला.

कुमार विश्वास यांनी सांगितल्यानुसार, सिनेमा श्री राम वनवासाला निघाले असतानाचा जो प्रसंग आहे, त्यात अरुण गोविल यांनी इतकी अप्रतिम भूमिका साकारली आहे की तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. विशेष म्हणजे, या सिनेमात अरुण गोविल यांनी श्री रामांचे वडील दशरथ यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी सुमारे तीन महिने आधी प्रदर्शित होत असलेल्या या ट्रेलरबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • अखेर मोठी बातमी धडकलीच ! लाडक्या बहिणांना मिळणार 40 हजार रुपये; थेट सपाचं कनेक्शन…
  • लढाऊ विमानांनाही असते ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या
  • IND vs SL : टीम इंडियाचा फॉलोऑन देण्याचा निर्णय चुकणार का? चौथ्या आणि पाचव्या दिवसाचं गणित काय?
  • Rohit Pawar : 40 लाख रुपयांना पेपर फोडला, रोहित पवार यांचा MPSC पेपर फुटीवर खळबळजनक दावा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in