• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

180 फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता, तरीही लागला नाही फ्लॉप स्टारचा टॅग, शोलेच्या कलाकारांना दिलेली टक्कर

September 2, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये पदार्पण करणे सोपे असले तरी या इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण करून ती टिकवणे तितकेच कठीण आहे. एखाद्या कलाकाराच्या कारकिर्दीचा अंदाज अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवरून लावला जातो. मात्र, काही कलाकार असे असतात जे अपयश आलं तरी हार मानत नाहीत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे त्यापैकीच एक नाव आहे.

जवळपास पाच दशकांच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत मिथुन चक्रवर्ती यांनी शेकडो चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र, या अपयशांमुळे त्यांच्यावर कधीही ‘फ्लॉप स्टार’चा शिक्का बसला नाही. उलट, आपल्या मेहनतीच्या आणि संयमाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.

मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये मृणाल सेन यांच्या ‘मृगया’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटातील ‘घिनुआ’ या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिळालेला हा सन्मान त्यांच्या अभिनय प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला.

90 च्या दशकात फ्लॉप सिनेमांची मालिकाच

मिथुन चक्रवर्ती यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे ‘डिस्को डान्सर’. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने मिथुनदांना घराघरात पोहोचवलं. त्यांच्या डान्स आणि अभिनयाची मोठी चर्चा झाली आणि ते रातोरात सुपरस्टार बनले.

‘डिस्को डान्सर’च्या अभूतपूर्व यशानंतर मिथुन यांच्या कारकिर्दीला वेग आला. मात्र, यशाची ही घोडदौड कायम राहिली नाही. 90 च्या दशकात त्यांनी मोठ्या संख्येने चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्यातील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले.

180 फ्लॉप चित्रपट देऊनही स्टारडम कायम

मिथुन यांचे 180 हून अधिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याचे विविध अहवालांमध्ये नमूद केले जाते. त्यापैकी अनेक चित्रपटांना ‘डिझास्टर’ म्हटलं गेलं. मात्र, एवढ्या अपयशानंतरही मिथुन चक्रवर्ती यांचं स्टारडम आणि लोकप्रियता कायम राहिली.

आजही मिथुनदा हे बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि प्रभावशाली कलाकारांपैकी एक मानले जातात. त्यांच्या कारकिर्दीतील अनेक चढ-उतार हे नव्या कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • या उद्योगपतीच्या घराची किंमत अंबानींच्या अँटिलियापेक्षा जास्त, आतमध्ये आहेत भन्नाट सुविधा
  • तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील 4 हॉटेलांवर FDA ची मोठी कारवाई, परवाने निलंबित
  • पाकिस्तानातील 100 वर्षे जुनं हिंदू मंदिर पाडल्याने खळबळ, भारताचा आक्रमक पवित्रा, पाक सरकारकडे मोठी मागणी
  • कुणाच्या भीतीने डोनाल्ड ट्रम्प ट्रकमध्ये लपून पळाले? नेटफ्लिक्सच्या सीरिजमधून होणार खुलासा
  • Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in