• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

12 तास शूटिंग करून ही अभिनेत्री पोहोचली वारीत, साधेपणामुळे होतंय प्रचंड कौतुक

July 15, 2026 by admin Leave a Comment


आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांमुळे राज्यभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.

यंदाच्या वारीत सर्वसामान्य भाविकांसोबतच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. त्यात आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचे नावही चर्चेत आले आहे.

यंदाच्या वारीत सर्वसामान्य भाविकांसोबतच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. त्यात आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचे नावही चर्चेत आले आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची प्रभावी भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली प्राजक्ता गायकवाड नुकतीच पालखी सोहळ्यात सहभागी झाली. विठ्ठलभक्तीने भारावलेल्या प्राजक्ताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या साधेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची प्रभावी भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली प्राजक्ता गायकवाड नुकतीच पालखी सोहळ्यात सहभागी झाली. विठ्ठलभक्तीने भारावलेल्या प्राजक्ताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिच्या साधेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्राजक्ताने पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. कपाळावर बुक्का आणि गंध गळ्यात तुळशीची माळ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेत ती वारकऱ्यांसोबत विठ्ठलनामाचा गजर करत चालताना दिसली. तिचा हा भक्तिमय आणि साधा लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

प्राजक्ताने पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. कपाळावर बुक्का आणि गंध, गळ्यात तुळशीची माळ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेत ती वारकऱ्यांसोबत विठ्ठलनामाचा गजर करत चालताना दिसली. तिचा हा भक्तिमय आणि साधा लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.

या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने वारी चुकायची नाही... असे कॅप्शन दिले आहे. सध्या प्राजक्ता गायकवाड तिच्या नव्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मालिकांच्या शूटिंगमुळे कलाकारांना दररोज 12 ते 14 तास काम करावे लागते.  अशा धावपळीच्या आणि व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्राजक्ताने पालखी सोहळ्यात सहभागी होत दर्शन घेतले. तिच्या या भक्तिभावाचे आणि श्रद्धेचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने वारी चुकायची नाही… असे कॅप्शन दिले आहे. सध्या प्राजक्ता गायकवाड तिच्या नव्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मालिकांच्या शूटिंगमुळे कलाकारांना दररोज 12 ते 14 तास काम करावे लागते. अशा धावपळीच्या आणि व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्राजक्ताने पालखी सोहळ्यात सहभागी होत दर्शन घेतले. तिच्या या भक्तिभावाचे आणि श्रद्धेचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुकाराम मुंढेंच्या रडारवर राज्यातील अंगणवाड्या, थेट आदेशाने टेन्शन वाढलं; या गोष्टींची तपासणी होणार!
  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in