• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ॲडव्हेंचर लव्हर असाल तर भारतातील बेस्ट पॅराग्लायडिंग डेस्टीनेशनला भेट द्या..

August 30, 2026 by admin Leave a Comment


साहसी पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर भारतातील काही स्थळांना तुम्ही भेट द्यायला हवी. येथे पॅराग्लायडिंग करण्याची देखील संधी मिळते. त्यामुळे आकाशात पक्षा प्रमाणे उड्डाण घेण्याचा आनंद घेता येतो. भारतातील काही मोजक्या ठिकाणी पॅराग्लायडिंग करण्याची मजा घेता येते. हे पर्यटनस्थळे ॲडव्हेंचर प्रेमींसाठी स्वर्गाहून कमी नाहीत. चला तर आपण आज पाहूयात भारतातील काही पॅराग्लायडिंगची केंद्रे..

पॅराग्लायडिंग एक असे स्पोर्ट्स आहे जे रोमांच उभे करते. यात तुम्ही नव शिके असाल तरी सोबत ट्रेन पॅराग्लायडर घेऊन देखील उड्डाण घेऊ शकता. जर आधी कधी पॅराग्लायडिंग केली असेल तर सोलो उड्डाण देखील घेऊ शकता. सध्या आपण भारताची बेस्ट पॅराग्लायडिंग डेस्टीनेशन कोणती ती पाहूयात…

हिमाचल प्रदेशातील डेस्टिनेशन्स

पॅराग्लायडिंगसाठी तुम्ही हिमाचल प्रदेशातील बी-बिलिंग येथे जाऊ शकता. हे केंद्र कांगडा जिल्ह्यातील जोगिंदर खोऱ्यात आहे.या जागेला भारताच्या पॅराग्लायडिंगची राजधानी म्हटले जाते. येछे सुमारे २,४०० मीटर उंची वरुन उड्डाण घेता येते. सोलंग व्हॅली हिमाचल प्रदेशातील दुसरी सर्वात प्रसिद्ध पॅराग्लायडिंग डेस्टीनेशन आहे.

नैनीतालमध्येही पॅराग्लायडिंग

उत्तराखंडातील वसलेले नैनीताल एक सुंदर हील स्टेशन आहे. ज्याला सरोसरसाठी ओळखले जाते. परंतू जर एडव्हेंचर लव्हर असाल तर येथील भीमताल आणि नौकचियाताल येथे नक्की भेट द्या. हजारो फूट उंचीवरुन पॅराग्लायडिंग करत चारी बाजूंचे नैसर्गिक दृश्य कमालीचे सुंदर आहे.

महाराष्ट्रातील कामशेत

चारी बाजूंनी हिरवाई आणि डोंगरात पॅराग्लायडिंग करण्याचा भन्नाट अनुभव देणारे महाराष्ट्रातील कामशेत देखील पॅराग्लायडिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. येथील प्रसिद्ध जागा टेक ऑफ पॉईंट टॉवर हिल आहे. येथे ९०० ते १२०० फूट उंचीवरुन उड्डाण घेता येते. यामुळे पहिल्यांदा पॅराग्लायडिंग करणाऱ्यांसाठी ही जागा उत्तम आहे.

सिक्कीमचे गंगटोक

पॅराग्लायडिंगसाठी भारतातील बेस्ट जागात गंगटोकचा समावेश आहे. येथे पॅराग्लायडिंग दारा दारा येथून सुरु होते. येथे २,००० फूट उंची आहे. या जागेचे लोकांना खूप आकर्षण आहे कारण येथे हिमालयाचे शानदार नजारे पाहायला मिळतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आताच संघात परतला होता अन् पुन्हा डच्चू मिळणार, गिल-गंभीरच्या हट्टापायी मॅचविनरचं नुकसान होणार
  • राज्यात आणखी एका परीक्षेत गोंधळ? पुण्यातून मोठी माहिती समोर; विद्यार्थ्यांमध्ये संताप!
  • गाणं जुनं, पण क्रेझ नवी, ‘हम साथ साथ हैं’मधील या गाण्याची लोकप्रियता अजूनही कायम, बनतात लाखो रील्स
  • 30 किमी उंचीवरून iPhone 17 Pro फेकला, जमिनीवर कोसळताच… फोनचं नेमकं काय झालं?
  • जरांगेंचा इशारा तरी संजय जाधवांचा थाटात कार्यक्रम, स्टेजवर जाऊन शिंदेंचे आरक्षणावर मोठे विधान; म्हणाले जरांगे…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in