• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आताच संघात परतला होता अन् पुन्हा डच्चू मिळणार, गिल-गंभीरच्या हट्टापायी मॅचविनरचं नुकसान होणार

August 30, 2026 by admin Leave a Comment

पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी फारसा वेळ उरलेला नाही. भारतीय संघाला यावेळी विजेतेपद पटकावण्यासाठी कोणतीही कसर सोडायची नाही. त्यामुळे, त्यांनी तयारी सुरू केली असून काही निर्णयही घेतले आहेत. अनेक नवीन खेळाडूची संघात एन्ट्री होईल अशी चिन्हे दिसत आहेत. आता अशा खेळाडूचा पत्ता कट होणार आहे जो नुकताच संघाच परतला होता. कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा मॅचविनरचे मोठे नुकसान होणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार तिलक वर्मा आता वनडे संघात स्थान मिळवणार आहे. तिलकला राखीव खेळाडू म्हणून ठेवणार आहेत, गरज भासल्यास श्रेयसच्या जागी तिलकलाही संघात स्थान दिले जाऊ शकते. तिलक डावखुरा फलंदाज आहेत आणि जर तो संघात सामील झाला, तर उजव्या हाताच्या फलंदाजांचे वर्चस्व असलेल्या फलंदाजीच्या क्रमात विविधता येईल. भारताच्या संघात पहिल्या तीन क्रमांकांमध्ये फक्त उजव्या हाताचे फलंदाज आहेत. या वृत्तात असेही म्हटले आहे की, तिलकला त्याच्या गोलंदाजीवर काम करण्यास सांगितले आहे, कारण व्यवस्थापनाला त्याच्या ऑफ-स्पिनमध्ये लक्षणीय प्रतिभा दिसते. संघाकडे वरच्या फळीत गरजेच्या वेळी उपयोगी पडतील असे पुरेसे गोलंदाजीचे पर्याय नाहीत. जर तिलकने योगदान दिले, तर ते फायदेशीर ठरेल.

या अहवालात बीसीसीआयच्या एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांना वाटते की, मधल्या फळीत संघाकडे पुरेसा पर्याय नाही. हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी सतत दुखापतींनी त्रस्त आहेत. त्यामुळे, त्यांना असा खेळाडू हवा आहे जो एकदिवसीय सामन्यांमध्ये चार षटके गोलंदाजी करू शकेल.”

याच कारणास्तव, संघ व्यवस्थापनाने वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनाही संधी दिली आहे. सूत्राने असेही म्हटले आहे की, व्यवस्थापनाला पर्याय म्हणून तरुण खेळाडूंची गरज आहे. संघाला दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल. ऑस्ट्रेलियात खेळताना श्रेयस जखमी झाला होता. अलीकडे वेग आणि उसळीविरुद्ध त्याची परीक्षा झालेली नाही. संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या रूपाने आधीच दोन अनुभवी खेळाडू आहेत. विश्वचषक येईपर्यंत केएल राहुलही ३५ वर्षांचा होईल. जडेजाचे पुनरागमनही अनिश्चित आहे. तंदुरुस्तीच्या समस्यांमुळे संघाच्या क्षेत्ररक्षणातही अडचण येत आहे. संघ व्यवस्थापनाला वाटते की त्यांना राखीव खेळाडू म्हणून तरुण खेळाडूंची गरज आहे.”

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in