• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

30 किमी उंचीवरून iPhone 17 Pro फेकला, जमिनीवर कोसळताच… फोनचं नेमकं काय झालं?

August 30, 2026 by admin Leave a Comment


तैवानमधील फोन कव्हर बनवणारी कंपनी रायनोशील्डने एक भन्नाट आणि तितकाच धोकादायक प्रयोग केला आहे. या प्रयोगात आयफोन 17 प्रो तब्बल 30 किलोमीटर उंचीवर नेऊन कोणत्याही पॅराशूटशिवाय खाली सोडण्यात आला. विशेष म्हणजे, एवढ्या उंचीवरून जमिनीवर कोसळल्यानंतरही फोन व्यवस्थित सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. 24 जून रोजी स्वीडनमध्ये हा प्रयोग करण्यात आला. यासाठी एका हाय-अल्टिट्यूड बलूनच्या मदतीने आयफोन 17 प्रो ला पृथ्वीपासून तब्बल 30 किलोमीटर उंचीवर नेण्यात आले. त्यानंतर फोनला कोणत्याही पॅराशूटशिवाय खाली सोडण्यात आले.

30 किमी उंचीवरून फोन खाली सोडला

फोनला जमिनीवर पोहोचण्यासाठी सुमारे 25 मिनिटांचा वेळ लागला. या काळात फोनला अतिशय कमी तापमान आणि कमी वातावरणीय दाबाचा सामना करावा लागला. उपलब्ध माहितीनुसार, या उंचीवर तापमान सुमारे उणे 40 ते उणे 60 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीनंतर फोन स्वीडनमधील नैसर्गिक भूभागावर पोहोचला.एवढ्या उंचीवरून खाली येताना फोनला मोठा धोका पोहोचण्याची शक्यता होती. मात्र, जमिनीवर पोहोचल्यानंतरही फोन व्यवस्थित काम करत असल्याचे प्रयोगातून दाखवण्यात आले. विशेष म्हणजे, फोन चालू होता, त्यावरून कॉलही करता येत होता आणि फोटोदेखील क्लिक करता येत होते. त्यामुळे या प्रयोगाचा व्हिडिओ आणि त्यातील निकाल पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

रायनोशील्डच्या प्रयोगामागील उद्देश काय?

या प्रयोगामागे रायनोशील्डच्या फोन कव्हरचा प्रचार करण्याचा उद्देश होता. कंपनीने आपल्या कव्हरची मजबुती आणि फोनला मिळणारे संरक्षण दाखवण्यासाठी हा अनोखा प्रयोग केला. त्यानंतर 26 ऑगस्ट रोजी या प्रयोगाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे सांगण्यात आले. हा प्रयोग सर्वाधिक उंचीवरून करण्यात आलेला मोबाइल ड्रॉप प्रयोग ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.

आता या प्रयोगानंतर सोशल मीडियावर एकच प्रश्न चर्चेत आहे. आयफोन 17 Pro ची क्वालिटी इतकी जबरदस्त होती की रायनोशील्डच्या कव्हरने फोनला वाचवलं? नेमकं श्रेय फोनला द्यायचं की कव्हरला, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in