• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जरांगेंचा इशारा तरी संजय जाधवांचा थाटात कार्यक्रम, स्टेजवर जाऊन शिंदेंचे आरक्षणावर मोठे विधान; म्हणाले जरांगे…

August 30, 2026 by admin Leave a Comment


आज परभणीमध्ये शिवसेनेचा शेतकरी मेळावा पार पडला, खासदार संजय जाधव यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. दरम्यान या मेळाव्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यांनी खासदार संजय जाधव यांना इशारा देखील दिला होता. मात्र तरी देखील हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

मला कोणावरही टीका करायची नाही, ठरलेला कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणं शक्य नव्हतं. मराठा समाजाला न्याय देण्याची सुरुवात महायुती सरकराने केली. कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे.  मनोज जरांगे पाटलांची समाजाविषयीची तळमळ मला माहितीये. आताही आमचे मंत्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, मी फक्त बघत बसलो… महायुतीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली खदखद
  • केरळमध्ये बस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे वृद्ध प्रवासी पडण्यापासून वाचले
  • Uday Samant On Manoj Jarange Protest : 24 तासात योग्य तो निर्णय घेऊ- उदय सामंत
  • Chanakya Niti : आयुष्यात या तीन चुका कधीच करू नका, येईल पश्चातापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
  • घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in