• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हॉलीवूडचा चित्रपट पाहून काढला बायकोचा काटा; तलवार, कात्री अन्… नवऱ्याचा थरकाप उडवणारा कांड समोर

August 6, 2026 by admin Leave a Comment


राजधानी दिल्लीतून थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. शाहदरातील जगतपुरी परिसरात पत्नीची हत्या करून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतीने पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वादातून आरोपीने कट रचून पत्नीची हत्या केली. गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत मोठी रोकड घेऊन तो फरार झाला आणि नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्याला मथुरा रेल्वे स्थानकाजवळून अटक केली. त्याच्याकडून 12 लाख 75 हजार रुपयांची रोकड आणि गुन्ह्यानंतर वापरलेली स्कूटर जप्त केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै रोजी गगन विहार येथील एका घरात महिलेची हत्या झाली असल्याचा फोन आला होता. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना कोमल सिंह यांचा मृतदेह ड्रॉइंग रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. प्राथमिक तपासात घटनास्थळावर रक्ताने माखलेली कात्री मिळाली, जी हत्येसाठी वापरलेल्या शस्त्रांपैकी एक असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मृत महिलेचा मुलगा गौरव याने पोलिसांना दिली होती.

पती-पत्नीमध्ये झाला होता वाद

मृत महिलेचा मुलगा गौरव आणि त्याच्या बहिणीने पोलिसांना सांगितले की, 30 जुलैच्या सकाळी घराबाहेर पडताना त्यांनी आई-वडिलांमध्ये मालमत्तेवरून जोरदार वाद होताना पाहिला होता. संध्याकाळी आईचा फोन लागत नसल्याने गौरव घरी आला. तेव्हा त्याला आईचा मृतदेह दिसला आणि त्याने तत्काळ पोलिसांना कळवले. त्या वेळी वडील घरातून फरार झाले होते.

आरोपी CCTV मध्ये कैद

या घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये आरोपी बॅग घेऊन स्कूटरवर जाताना दिसला. त्या बॅगेतून तलवारीचा दांडा बाहेर दिसत होता, जो कपड्याने झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आणखी एका सीसीटीव्हीमध्ये महिलेच्या किंचाळण्याचा आवाज स्पष्ट ऐकू आला होता.

12.75 लाख रुपये घेऊन फरार

हत्या केल्यानंतर आरोपीने तलवार सोबत नेऊन रस्त्यात फेकून दिली. त्यानंतर त्याने आपल्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांतून 7 लाख रुपये काढले, तसेच पत्नीच्या खोलीतून 5 लाख रुपये रोख घेतले आणि मोठी रक्कम घेऊन फरार झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक देखरेख आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे यांची मदत घेतली. दिल्लीपासून उत्तर प्रदेशपर्यंत सुमारे 10 पोलिस पथकांनी आरोपीचा पाठलाग केला आणि त्याला मथुरा रेल्वे स्थानकाजवळून अटक करण्यात आली.

मालमत्तेच्या वादातून काढला पत्नीचा काटा

पोलिसांच्या चौकशीत आरोपी कमल सिंह याने कबूल केले की, मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्याच्या वादातून त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. हत्येसाठी त्याने आधीच शस्त्र विकत घेतले होते. गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी शस्त्राची विल्हेवाट लावण्याचाही प्रयत्न केला.

हॉलीवूड चित्रपटातून घेतली प्रेरणा

आरोपीने चौकशीत आणखी एक धक्कादायक खुलासा की, हॉलीवूडमधील ‘द स्टेअरकेस’ या क्राइम चित्रपटामुळे पत्नीची हत्या करण्याची प्रेरणा मिळाली. हत्येत वापरलेले शस्त्र गायब केले तर पोलिसांकडे त्याच्याविरोधात कोणताही पुरावा उरणार नाही असे त्याला वाटले. त्यामुळे त्याने तलवार रस्त्यात फेकून दिली. मात्र, रक्ताने माखलेली कात्री घरातच राहिली, जी पोलिसांनी जप्त केली असून आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in