• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हार्दिक पांड्यासाठी लखनौ सुपर जायंट्सने टाकले फासे! बदल्यात हा खेळाडू देण्याची तयारी

August 11, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी आयपीएल 2027 स्पर्धेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. दोन दिवसाआड त्याच्या ट्रेडिंगच्या बातम्या समोर येत आहेत. कधी ही फ्रेंचायझी तर कधी त्या फ्रेंचायझीसोबत त्याचं नाव जोडलं जात आहे. पण अधिकृतरित्या काहीच समोर आलेलं नाही. आता एका रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्सने हार्दिक पांड्यासाठी फासे टाकल्याचं बोललं जात आहे. नुकतंच लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला रिलीज केलं आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सकडून कुलदीप यादवला संघात घेतलं आहे. पण लखनौ सुपर जायंट्सला एका चांगल्या अनुभवी कर्णधाराची गरज आहे. हार्दिक पांड्याच्या रुपाने गरज भरून निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स त्याच्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. टी20 क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्यासारखा वेगवान गोलंदाजी करणारा आणि खालच्या क्रमांकावर येऊन मॅच फिनिश करणारा दर्जेदार भारतीय अष्टपैलू खेळाडू मिळणे कठीण आहे. त्यामुळे त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी लखनौ दाखवल्याचं बोललं जात आहे.

हार्दिकसाठी निकोलस पूरनला सोडणार!

हार्दिक पांड्याला संघात घेण्यासाठी लखनौ सुपर जायंट्स एक ऑफर दिल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. हार्दिकसाठी निकोलस पूरनला सोडण्याची तयारी लखनौ सुपर जायंट्सने दाखवली आहे. निकोलस पूरनची रिटेन्शन किंवा सॅलरी व्हॅल्यू खूप जास्त आहे. निकोलस पूरनसाठी 21 कोटी रुपये मोजत आहेत. जर लखनौने त्याला ट्रेड केले, तर हार्दिकला घेणं सोपं जाईल. यासाठी मुंबई इंडियन्सला निकोलस पूरन आणि 10 कोटींची ऑफर दिल्याची चर्चा आहे. त्यात निकोलस पूरनची मागच्या पर्वात कामगिरी काही खास नव्हती. त्यामुळे त्याला सोडण्याचा विचार लखनौ सुपर जायंट्स करत असल्याचं बोललं जात आहे. पण हा ट्रेड मान्य होईल का? हा देखील प्रश्न आहे.

हार्दिक पांड्याची आयपीएल कारकीर्द

मुंबई इंडियन्सने 2015 मध्ये हार्दिक पांड्याला 10 लाखांच्या बेस प्राईसमध्ये घेतलं होतं. त्याने 2021 पर्यंत मुंबई इंडियन्समध्ये कारकीर्द गाजवली.गुजरात टायटन्सने 2022 मध्ये त्याला 15 कोटी रुपयांमध्ये ड्राफ्ट केले आणि संघाचा कर्णधार बनवले. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने पहिल्याच फटक्यात जेतेपद मिळवलं. त्यानंतर 2023 मध्ये त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने अंतिम फेरी गाठली होती. पण 2024 मध्ये मुंबई इंडियन्स ट्रेड विंडोच्या माध्यमातून त्याला संघात घेतलं. तसेच त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं. पण 2024 ते 2026 या कार्यकाळात त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यामुळे त्याला रिलीज करणार या चर्चांना उधाण आलं आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in