
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या अपघातासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. “हात जोडून सांगते, आजपासून मी अजित दादांच्या अपघातावर बोलणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये अशी विनंती केली होती, त्यानंतर सुप्रिया सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. सुळे यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “एखाद्या फोटोसाठी आम्ही ठाकरेवर एफआयआर दाखल केला जातो, पण सत्तेतील उपमुख्यमंत्री असलेल्या माझ्या भावाच्या एवढ्या मोठ्या अपघाताचा एफआयआर का नाही?” असा सवाल त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ४० आमदार आणि ८-९ मंत्र्यांनीही याबाबत कोणतीही मागणी केली नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली आहे. तपास यंत्रणा त्यांचे काम करत असून त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे असे त्यांचे मत आहे. सतत माध्यमांत येऊन अपडेट मिळण्याऐवजी, यामुळे मीडिया ट्रायल होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. “हात जोडून विनंती आहे, आम्ही कोणीही त्यांच्यावर बोलणं आजपासून मी हा विषय बंद करते,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर पूर्णविराम दिला.
Leave a Reply