• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सॉरी….सॉरी दोन मिनिट…, रंगत आलेलं नाटक अचानक स्वप्नील जोशीने अर्ध्यात थांबवलं, नेमकं काय घडलं?

May 30, 2026 by admin Leave a Comment


रंगमंचावरील कलाकारांना नाटकादरम्यान प्रेक्षकांकडून होणारे विविध व्यत्यय नवे नाहीत. मोबाईल फोनच्या रिंगटोनपासून ते मोठ्याने होणाऱ्या संभाषणांपर्यंत अनेक प्रसंग कलाकारांना अनुभवावे लागतात. मात्र काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की कलाकारांना थेट हस्तक्षेप करावा लागतो. असाच एक प्रसंग अभिनेता स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर यांच्या ‘लग्नपंचमी’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडला.

सध्या रंगभूमीवर ‘लग्नपंचमी’ नाटकाची जोरदार चर्चा असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या नाटकाने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. जिथे होईल नात्याचं सेलिब्रेशन आणि हास्याची उधळण या टॅगलाईनसह आलेल्या या नाटकात विनोद, भावना आणि नातेसंबंधांची सुंदर गुंफण पाहायला मिळतात.

एक मिनिट… सॉरी.

अलीकडेच झालेल्या एका प्रयोगादरम्यान नाटक रंगात आलेले असतानाच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका लहान बाळाचे रडणे सुरू झाले. सुरुवातीला कलाकारांनी संवाद सुरू ठेवत परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाळाचा रडण्याचा आवाज सतत येत राहिल्याने रंगमंचावरील संवाद आणि वातावरणावर परिणाम होऊ लागला.

त्या वेळी नाटकातील एका महत्त्वाच्या प्रसंगात स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर संवाद सादर करत होते. या संवादादरम्यानही बाळाच्या रडण्याचा आवाज सतत ऐकू येत होता. काही वेळ परिस्थिती हाताळल्यानंतर स्वप्नीलने नाटकाचा प्रवाह थोडा वेळ थांबवत अत्यंत नम्रपणे प्रेक्षकांकडे पाहिले आणि म्हणाला, एक मिनिट… सॉरी… त्या बाळाला बाहेर घेऊन जाऊ शकतो का आपण, प्लीज? त्याच्या या विनंतीनंतर संबंधित प्रेक्षकांकडून सॉरी, सॉरी असा प्रतिसाद आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lagna Panchami (@lagna_panchami)

प्रेक्षकांनी देखील स्वप्नीचं केलं कौतुक

यावरही स्वप्नीलने संयम आणि समजूतदारपणा दाखवत, नाही नाही, काही हरकत नाही. पण सगळ्यांचाच रसभंग होतोय असे सांगितले. त्यांनी कुणालाही दुखावणार नाही अशा पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने उपस्थित प्रेक्षकांनीही त्यांचे कौतुक केले.

या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ ‘लग्नपंचमी’च्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला असून तो सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. स्वप्नील जोशीने दाखवलेल्या संयमाचे आणि प्रसंगावधानाचे अनेकांनी कौतुक केले आहे. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील समन्वय किती महत्त्वाचा असतो याचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया अनेक रंगप्रेमींनी व्यक्त केली आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in