• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सिनेमा बनण्यासाठी लागली तब्बल 20 वर्ष, 3 लाख लोकांसोबत शुटिंग, 183 कोटींचं बजेट अन् कमाई तर, बाप रे बाप…

July 5, 2026 by admin Leave a Comment


मोठ्या पडद्यावर अनेक सिनेमे प्रदर्शित होतात, काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात, तर काही सिनेमे मात्र बजेट अधिक असून देखील चांगली कमाई करत नाहीत. पण काही सिनेमे असे असतात, जे अनेक दशकांनंतर देखील प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. अशाच एका सिनेमांपैकी एक म्हणजे ‘गांधी’ सिनेमा. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण सिनेमाची प्रतिक्षा सर्वांना तब्बल 20 वर्ष करावी लागली. कारण सिनेमा तयार होण्यासाठी 20 वर्षांचा कालावधी लागली. ‘गांधी’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा फक्त देशातच नाही तर, ऑस्कर पुरस्कार देखील स्वतःच्या नावावर केले… सिनेमाने मोठा इतिहास रचला… ज्याची चर्चा आजही होत असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सिनेमा ब्रिटीश – इंडियन प्रॉडक्शन होता, पण सिनेमात अनेक भारतीय कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली.

‘गांधी’ सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक रिचर्ड एटनबरो यांनी केलं होतं. महात्मा गांधी यांचा जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर आणण्याचं रिचर्ड यांचं स्वप्न होतं. त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी 20 वर्ष लागली. पण तो प्रवास फार कठीण होता. सिनेमासाठी निधी पासून रिसर्च आणि प्रॉडक्शन पर्यंत अनेक संकटांचा सामना ‘गांधी’ सिनेमाच्या टिमने केला…

अभिनेते बेन किंग्सले यांनी सारारलेले गांधी

सिनेमात महात्म गांधी यांची भूमिका अभिनेत बेन किंग्सले यांनी साकरलेली. त्यांनी साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. यासाठी त्यांना बेस्ट अभिनेता ऑस्कर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. सिनेमा अभिनेत्री रोहिणी हट्टंगणी यांनी कस्तूरबा गांधी यांच्या भूमिकेला न्याय दिला. यांच्यासोबत सिनेमात सईद जाफरी, रोशन सेठ, ओम पुरी आणि अमरीश पुरी या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारलेली.

‘गांधी’ सिनेमाचं चित्रीकरण 31 जानेवारी 1981 रोजी दिल्लीत झालं; हा दिवस महात्मा गांधींच्या अंत्यसंस्काराच्या घटनेला 33 वर्षे पूर्ण होण्याचा दिवस होता. मूळ अंत्यसंस्काराच्या वेळी 200,000 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते, तर सिनेमातील त्या सीनसाठी गर्दी उभी करण्याकरिता टीमने 94 हजार 560 लोकांना स्वतःच्या खर्चाने बोलावलं होतं. चित्रीकरणादरम्यान, गांधींची भूमिका साकारणारे अभिनेते बेन किंग्सले शांत राहिले, तर त्यांच्याभोवती ती गर्दी चालत होती.

11 नामांकन, 8 ऑस्कर आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन

1983 च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘गांधी’ या सिनेमाला 11 श्रेणींमध्ये नामांकने मिळाली आणि 8 ऑस्कर पुरस्कार जिंकले. सिनेमाने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’, ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ आणि ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ यांसारखे अनेक महत्त्वाचे पुरस्कार पटकावले. सुमारे 183 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये निर्मिती झालेल्या या चित्रपटाने जगभरात अंदाजे 1050 कोटी रुपयांची कमाई केली.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in