• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सिनेमा असावा तर असा.. एका झटक्यात धुरंधर, टॉक्सिक, आवारापन 2 ला टाकलं मागे; कमावला तब्बल 2000 टक्के नफा

September 1, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट हिट होण्यासाठी मोठे स्टार्स, कोट्यवधींचं बजेट आणि जोरदार प्रमोशन आवश्यक असतं, असं मानलं जातं. मात्र, 2026 मध्ये आलेल्या एका चित्रपटाने ही संपूर्ण गणितं बदलून टाकली आहेत. फक्त 2 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तब्बल 2000 टक्के नफा कमावला आहे. हा सध्या भारतातील सर्वात फायदेशीर सिनेमांपैकी एक ठरला आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात कोणताही मोठा सुपरस्टार नाही. त्याचबरोबर प्रदर्शनाआधी फार मोठं प्रमोशनही करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर फारशा अपेक्षा नव्हत्या. 7 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात त्याला अत्यंत थंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या वीकेंडला सिनेमाने केवळ 60 लाख रुपयांची कमाई केली होती. मात्र, दुसऱ्या आठवड्यानंतर चित्र पूर्णपणे बदललं.

प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे चित्रपटाची चर्चा वाढू लागली. सोशल मीडिया आणि तोंडी प्रसिद्धीमुळे थिएटरमध्ये प्रेक्षकांची संख्या वाढली आणि त्यानंतर चित्रपटगृहांनीही त्याचे शो वाढवले. चौथ्या वीकेंडपर्यंत या चित्रपटाने तब्बल 28 कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतरही त्याची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम राहिली.

या चित्रपटाचं नाव 'हनुमान अंश' असून असून त्याने भारतात आतापर्यंत 40 कोटी रुपयांहून अधिक नेट कलेक्शन केलं आहे. आता तो 50 कोटींच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या नफ्याची तुलना मोठ्या बजेटच्या चित्रपटांशी केली जात आहे. 'हनुमान अंश'ने कमाईतून आतापर्यंत 2000 टक्के नफा कमावला आहे. या तुलनेत 'धुरंधर'ने 1000 टक्के नफा कमावला होता. तर इमरान हाश्मीच्या 'आवारापन 2'ने 450 टक्के नफा कमावला आहे.

लक्ष्मण दास हे नीम करोली बाबा कसे बनले, याची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या मते, चित्रपटाच्या कमाईची ही गती पाहता, 100 कोटी रुपयांची कमाई करणं 'हनुमान अंश'ला अशक्य नाही. जर चित्रपटाने हे यश मिळवलं तर तो आतापर्यंतच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक बनेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डॉ. राजेंद्र रुपनवर प्रकरणात ट्विस्ट, जबाब अचानक कसा बदलला? आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया समोर
  • सप्टेंबर महिना या 5 राशींसाठी ठरणार लाभदायक, चौथ्या राशीच्या जीवनात धन आणि प्रतिष्ठेत वाढ
  • Indus Water Treaty : सिंधू जल कराराचा निर्णय बाजूने लागताच पाकिस्तानला लगेच माज चढला, हिना रब्बानी खार यांनी भारताविरोधात ओकली गरळ
  • Todays Gold Rate: Import Duty कमी होणार अशी चर्चा रंगताच किमती धाडकन कोसळल्या, सोन्याचा आजचा भाव किती?
  • Rajat Bedi : वयाच्या 51 व्या रजत बेदीची नवी सुरुवात, म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी सुद्धा…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in