• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सलमान खानने मोजली स्टार बनण्याची किंमत; डोक्यावर टोचले बेकायदेशीर इंजेक्शन्स, पाहून निर्मात्यांना बसला धक्का!

July 31, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानबद्दल धक्कादायक दावा समोर आला आहे. चित्रपट निर्माते आणि ‘सनबर्न फेस्टिव्हल’चे सहसंस्थापक शैलेंद्र सिंह यांनी त्याच्या हेअर ट्रिटमेंटबद्दल खुलासा केला आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी सलमानला त्याच्या घरी पीआरपी हेअर ट्रीटमेंट घेताना पाहिलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलंय की त्यावेळी ही ट्रीटमेंट भारतात कायदेशीर नव्हती. सायरस भरुचाच्या पॉडकास्टमध्ये शैलेंद्र यांनी हा खुलासा केला आहे. एकेकाळी तेसुद्धा केस गळतीच्या समस्येमुळे खूप चिंतेत होते. ते जेव्हा एका कामासाठी सलमानच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांनी त्याला पीआरपी हेअर ट्रीटमेंट घेताना पाहिलं होतं.

पॉडकास्टमध्ये शैलेंद्र म्हणाले, “सलमान त्यावेळी बिर्याणी खात होता. तेव्हा त्याच्या मागून एक माणूस आला. त्याने हातमोजे घातले, एक सिरिंज बाहेर काढली आणि सलमानच्या डोक्यात इंजेक्शन टोचायला सुरुवात केली. हे नेमकं काय घडतंय, याचा विचार करून मला धक्काच बसला. नंतर सलमानने मला पाहून स्मितहास्य केलं. स्टार असण्याची एक किंमत मोजावी लागते दादा, असं तो मला म्हणालेला. नंतर त्याने मला सांगितलं की ती पीआरपी थेरपी होती, जी केस गळती थांबवण्यासाठी आणि नवीन केसांच्या वाढीसाठी केली जाते. पण ज्यावेळी मी सलमानला ही ट्रीटमेंट घेताना पाहिलं होतं, तेव्हा त्याला भारतात परवानगी नव्हती. सलमानच काय तर त्यावेळी अनेक मोठ्या कलाकारांनी हेच उपचार करून घेतले होते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

पीआरपी थेरपी म्हणजे काय?

प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी म्हणजेच पीआरपी थेरपीमध्ये रुग्णाच्या शरीरातून थोड्या प्रमाणात रक्त घेतलं जातं. नंतर एका मशीनच्या साहाय्याने रक्तातील प्लेटलेट्स वेगळ्या करून त्यांनी अधिक घन बनवलं जातं. हा प्लाझ्मा नंतर टाळूमध्ये इंजेक्ट केला जातो. यामुळे केसांची मुळं सक्रिय होतात, त्यांची वाढ सुधारते आणि घनता वाढते, असं मानलं जातं. परंतु याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात. शैलेंद्र सिंह यांच्या दाव्यावर सलमान खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • खुशखबर! कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, किती शेतकऱ्यांना लाभ, किती कोटी थेट खात्यावर पडणार?
  • ज्याची भीती होती तेच घडलं, यशस्वी जयस्वालवर ICC ची मोठी कारवाई, करिअरवर लागला डाग
  • हिरव्यागर्द झाडीतून नागमोडी वळणं घेताना दिसली वंदेभारत एक्स्प्रेस, मनमोहक बर्ड आय व्यूह व्हिडीओ व्हायरल
  • महायुतीची ‘मैत्री राज्यात, पुण्यात नाही’, निधी वाटपावरून राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे धाव, सुनील टिंगरेंचे पत्र
  • IND vs SL 2nd Test : ऋषभ पंतने शुबमन गिलचा रेकॉर्ड मोडला, या बाबतीत निघून गेला सर्वांच्या पुढे

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in