
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावलीमध्ये मोठा एल्गार दिला. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. कधी काळी समाज एकवटला त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक पुढं जायचं. 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला जर कोणी येड्यात काढत असेल त्यामुळे तुम्हाला बोलावलं. 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचं निर्णायक आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची अंतरवालीतून घोषणा केली. त्यांनी थेट पुन्हा शेवटच्या आंदोलनाची घोषणा केली.सरकार 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देत नाही म्हणून एकदम मोठं निर्णायक आंदोलन करायचे आहे. ज्यांना माहित आहे की, आपल्या नोंदी सापडल्या त्यांनी तात्काळ अर्ज करा.
पुढे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, समाजातील लेकरांच हाल होत आहे, गेल्या तीन वर्षांपासून रक्त जळतोय म्हणून समाजाच्या लेकरांसाठी शेवटचा निर्णायक आंदोलन करणार आहे. एकानेही घरी थांबायचं नाही, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सोडायचं नाही. हैद्राबाद गॅझेटीयर दिलं तर मग् प्रमाणपत्र का दिल नाही. मराठ्यांना टार्गेट कश्यामुळे करता, आधी तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल आणला.
आता तुकडा पडल्याशिवाय राहणार. हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता थांबणार नाही. 29 ऑगस्टपासून जोपर्यंत आंदोलन चालणार आहे, तो पर्यंत वेळ द्या. सर्वापक्षीय नेत्यांच्या मुलांना आरक्षण लागणार आहे. 28 ऑगस्टपर्यंत हैद्राबाद गॅझेट नुसार प्रमाण पत्र द्या, जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टीमेटम.
Leave a Reply