• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘सरेंडर करायचंय पण…’, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारा कुख्यात गुंड अखेर आला गुडघ्यांवर

July 4, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबारचा कट रचणारा कुख्यात गुंड अनमोल बिश्नोई अखेर गुडघ्यांवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्मसमर्पणासाठी म्हणजेत सरेंडर करण्यासाठी गँगस्टर अनमोल बिश्नोईची मुंबई विशेष MCOCA न्यायालयात धाव घेतली आहे. सलमान खान घर गोळीबार प्रकरणात आत्मसमर्पण करून खटल्याला सामोरे जाण्यासाठी अनमोल बिश्नोईने विशेष MCOCA न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तिहार तुरुंगात असलेल्या अनमोल बिश्नोई याने प्रॉडक्शन वॉरंट किंवा व्हर्च्युअल अपिअरन्सची विनंती केली आहे

मात्र विशेष मकोका न्यायालयाने फिर्यादी पक्षाकडून या संदर्भात प्रतिसाद मागितला आहे. गोळीबार प्रकरणात न्यायालयासमोर आत्मसमर्पण करून खटल्याला सामोरे जाण्यासाठी विशेष MCOCA न्यायालयात अनमोल बिष्णोई यांनी मांगणी केली आहे . नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आलेला अनमोल, सध्या NIA ने त्याच्यावर दाखल केलेल्या अनेक प्रकरणांसंदर्भात तिहार तुरुंगात आहे

‘मला सरेंडर करायचं आहे…’

विशेष MCOCA न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात अनमोलने नमूद केलं आहे की, निष्पक्ष खटला आणि न्यायाच्या हितास्तव, सुरू असलेल्या खटल्याला सामोरे जाण्यासाठी आणि न्यायालयीन कामकाजात सहभागी होण्यासाठी त्याला न्यायालयासमोर स्वेच्छेने शरण यायचं आहे. आता याप्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सलमान खान याच्या घरावर गोळीबार

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पाच गोळ्या झाडण्यात आलेल्या. ही घटना 14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4.45 वाजता घडलेली. दोन व्यक्ती मोटरसायकलीवरुन आल्या आणि त्यांनी अभिनेत्यांच्या घरावर गोळीबार करत दहशत निर्माण करण्यचा प्रयत्न केला… गोळीबारानंतर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली.

आता तर सलमान खान याने स्वतःचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खान आता स्वतःच्या जमिनीवर भव्य घर बांधणार आहे. अभिनेत्याला 6 मजल्यांच्या घराची परवानगी मिळाली आहे… सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचं काम पूर्ण झाल्यानंतर, संपू्र्ण खान कुटुंब एकचा घरात राहणार आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in