• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

सरकारी कार्यालयाच्या वॉशरुममध्ये स्पाय कॅमेरा, महिला सहकाऱ्याचे बनवले व्हिडीओ, एकतर्फी प्रेमातून विकृती…

May 31, 2026 by admin Leave a Comment


ओडिशा येथील जगतसिंहपूर येथील जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण (डीआरडीए)कार्यालयात महिला शौचालयात स्पाय कॅमेरे लावून महिला सहकाऱ्याचे व्हिडीओ बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. या घटनेत एका ज्युनिअर क्लार्कला अटक करण्यात आली आहे. या ज्युनिअर क्लार्क एका सहकारी महिला कर्मचाऱ्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र, या महिलेकडून त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.

यूट्यूबवरुन मिळाली स्पाय कॅमेऱ्याची माहिती

जगतसिंहपूरचे पोलिस अधिक्षक अंकित वर्मा यांनी माहिती देताना सांगितले की आरोपीचे वय ३० असून त्याचे नाव संजय आधेखा आहे. संजय डीआरडीए कार्यालयात ज्युनिअर क्लार्क होता. संजय याने युट्युबवरुन स्पाय कॅमेरे कसे वापरायचे याची माहिती घेतली. त्यानंतर त्याने जानेवारी महिन्यात ऑनलाईन स्पाय कॅमेरा विकत घेतला होता. त्यानंतर त्याने मार्च महिन्यात कार्यालयाच्या महिला शौचालयात त्याने तो बसल्याचे म्हटले जात आहे.

अचानक कॅमेरा पडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅमेरा अनेक महिने एक्टीव्ह राहिला होता. आरोपी दर आठवड्याला त्याला चार्ज करायचा आणि पुन्हा त्या जागी लावून ठेवायचा आणि रेकॉर्डिंग सुरु ठेवायचा. अचानक तो कॅमेरा पडल्याने महिला कर्मचाऱ्याला तेथे कॅमेरा असल्याचे कळले. त्यानंतर कार्यालयात एकच हंगामा झाला.

पोलिसांनी कॅमेरा जप्त केला

पोलिसांनी आरोपी संजय याला अटक केली आहे. त्याच्या चौकशीनंतर स्पाय कॅमेरा, मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह आणि सीसीटीव्ही हार्ड डिस्क जप्त केली आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांना फोरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहे. यात किती तासांचे रेकॉर्डिंग आहे याचा तपास पोलिस करत आहेत.यातील व्हिडीओ कुठे शेअर केले काय ? आणि या प्रकरणात आणखी कोणी सामील होते का ? याचा तपास केले जात आहे.

महिलांच्या खाजगीपणा आणि सुरक्षेचा मुद्दा

या घटनेनंतर सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या महिलांच्या खाजगीपणा आणि सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्मचारी संघटना आणि महिला अधिकार कार्यकर्त्यांनी या प्रकरणातील दोषीवर कठोर कारवाई करण्यासोबतच सरकारी कार्यालयातील महिला सुरक्षा नीट करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून फोरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर उपलब्ध साक्षींआधारे पुढील कारवाई केली जाणार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6 खासदारांच्या पक्षांतरावर अण्णा हजारे भडकले, म्हणाले; श्रद्धा, निष्ठा…
  • IMD Monsoon Update : पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे; या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान विभागाकडून मोठा इशारा
  • 27 वर्षे जुन्या चित्रपटाचा ओटीटीवर धुमाकूळ; ट्रेडिंगमध्ये टॉपर बनलाय ब्लॉकबस्टर
  • विना तिकीट प्रवास आता महागणार, रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांसाठी आता आणखी कठोर तरतूद
  • PF नॉमिनेशन केले नाहीये? खातेधारकाच्या मृत्यूनंतर क्लेम कसा आणि कोणाला मिळतो? पाहा सविस्तर कायदेशीर प्रक्रिया

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in