
काही वर्षांपूर्वी सीमा हैदर नावाची महिला पाकिस्तानमधून भारतामध्ये आली होती, तिने इथे सचिन मीणा नवाच्या तरुणासोबत लग्न केलं. सोशल मीडियावर सीमा हैदर आणि सचिन मीणा दोघेही कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच सचिन मीणा याने नवं घर बांधलं आहे, त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सचिन आणि सीमा या दोघांनी वाजत-गाजत आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा हे कपल चर्चेत आलं आहे. नुकताच सचिन मीणा याचा एक अतिशय भावनिक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कुटुंबापासून दुरावल्याचं दु:ख त्याने व्यक्त केलं आहे. आपल्याला सध्या आपली मुलं आणि सीमापासून दूर राहवं लागत असल्याचं त्याने म्हटलं आहे. बोलत असताना तो अतिशय भावनिक झाल्याचं पहायला मिळत आहे. बोलताना त्याला अश्रू अनावर झाले आहेत.
या व्हिडीओमध्ये सचिनने असं म्हटलं आहे की, गेल्या तीन दिवसांपासून तो आपल्या कामात प्रचंड व्यस्त आहे. तीन दिवसांपासून न थांबता कामानिमित्ताने बाईकवर प्रवास सुरूच आहे. या तीन दिवसांमध्ये एकदाही आपली आपल्या बायकोची तसेच मुलांची भेट झाली नसल्याचं सचिनने म्हटलं आहे. मी दिवस -रात्र मेहनत करत आहे, काम करतोय परंतु माझं लक्ष हे फक्त माझ्या मुलाकडे आणि सीमाकडेच लागलं असल्याचं या व्हिडीओमध्ये सचिनने म्हटलं आहे. यावेळी बोलताना तो चांगलाच भावनिक झाला असून, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आहेत.
मला कामानिमित्त सतत बाहेर जावं लागतं. मुलं आणि सीमाची भेट होत नाही. मात्र माझं सगळं लक्ष हे माझी पत्नी आणि मुलांकडेच असतं. मी जेव्हा बाहेर असतो तेव्हा त्यांची मला प्रचंड आठवण येते, असा या व्हिडीओमध्ये सचिनने म्हटलं आहे. दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे.
Leave a Reply