• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संजय राऊत कुणाचा माणूस? शरद पवार की राहुल गांधी? राऊतांनी दिलं थेट उत्तर

September 4, 2026 by admin Leave a Comment


संजय राऊत हे शरद पवार यांचा माणूस आहेत, अशी नेहमी चर्चा होते. आता राऊत हे राहुल गांधी यांचा माणूस असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा संजय राऊत यांना तुम्ही कुणाचा माणूस आहात? शरद पवार की राहुल गांधी? असा थेट प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, राऊत यांनी कोणताही आढावेढा न घेता मी बाळासाहेब ठाकऱ्यांचा माणूस आहे, असं उत्तर दिलं. आणि आजन्म बाळासाहेब ठाकऱ्यांचाच माणूस म्हणून राहिल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. दिनमान साहित्य उत्सवात राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी प्रत्येक चेंडूवर षटकार लगावला.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आणि अमेय तिरोडकर यांनी संजय राऊत यांची मुलाखत घेतली. राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या गाजलेल्या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी दिलखुलास उत्तरे दिली. त्याचवेळी त्यांनी राजकीय प्रश्नांनाही सडेतोड उत्तरं दिली. यावेळी चोरमारे यांनी राऊत यांना तुम्हाला आधी शरद पवारांचा माणूस म्हटलं जायचं. आता राहुल गांधींचा माणूस म्हणतात. हे शिफ्टिंग कसं झालं? असा सवाल केला. त्यावर राऊत यांनीही थेट उत्तर देऊन या चर्चांनाच पूर्णविराम दिला आहे.

कधीच बदल होणार नाही

मी बाळासाहेबांचा माणूस आहे. आजन्म असणार आहे. यात कधीच बदल होणार नाही, असं राऊत म्हणाले. देशाचं नेतृत्व करण्याची संधी शऱद पवारांकडे होती. दुर्देवाने ती त्यांना मिळाली नाही. तरीही ते नेते आहेत. दिल्लीतील मोठे नेते आज पवारच आहेत. सर्वच पक्षाचे नेते, मग भाजप, काँग्रेसला पालक असावा लागतो. ते कोण आहेत? शरद पवार आहेत. राहुल गांधी यांनी या देशाच्या नेतृत्वाला आकार आणि वेगळी दिशा दिली आहे. ज्या पद्धतीने ते संघर्ष करत आहेत. आम्ही त्यांच्यात आमची प्रतिमा पाहत आहोत. ते आमची लढाई लढत आहेत. आम्ही त्यांच्या यूपीएचे घटक आहोत. राष्ट्रीय स्तरावर राहुल गांधी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संवाद ठेवायचं असतो. तेच आघाडीचं राजकारण आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

पवारांवर नाराज नाही

तुम्ही पवारांवर नाराज आहात का? या प्रश्नावरही त्यांनी थेट उत्तर दिलं. मी पवारांवर नाराज नाही. कशाला नाराज असायचं? मी माझ्या पक्षाचं काम करतो. ते राष्ट्रीय काम करतात. मी त्यांच्यावर नाराज होईल इतका मोठा नाही. आमचे पक्ष वेगळे आहेत. भूमिका वेगळ्या असतात. आम्हाला आमच्या पक्षाच्या भूमिका पुढे न्यायच्या असतात. लोकशाही म्हटल्यावर असं करावं लागतं, असंही त्यांनी सांगितलं.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
  • पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
  • Akshaye Khanna : अक्षय खन्नाने एक-दोन नव्हे लगावल्या तब्बल 17 थप्पडा; ‘त्या’ कलाकाराचा चेहरा सुजून लालेलाल, सेटवर उडाली खळबळ
  • PCOS : सावधान! सडपातळ मुलींनाही होऊ शकतो हा गंभीर आजार; ही लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा!
  • 11 वर्षांपासून खात होती केस, डॉक्टरांनी पोटातून काढला 1.16 किलोचा गोळा, अजब घटनेची जगभरात चर्चा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in