• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PCOS : सावधान! सडपातळ मुलींनाही होऊ शकतो हा गंभीर आजार; ही लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा!

September 4, 2026 by admin Leave a Comment


पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम या गंभीर आजाराने अनेक महिलांना छळलं आहे. या आजाराच्या गांभीर्य पाहता आता मे 2026 पासून त्याचे नाव बदलण्यात आले आहे. आता या आजाराचे नाव हे PCOS पासून बदलून PMOS असे करण्यात आले आहे. हा आजार भारतात जवळपास 11.3 टक्के महिलांना झालेला आहे. म्हणजे हा आजार 9 पैकी एका महिलेला हा आजार झालेला आहे. दरम्यान हा आजार केवळ गर्भाशयापुरता मर्यादित नसून त्याता थेट परिणाम शरीराच्या मेटाबॉलिझमवर होतोय.

‘लीन पीसीओएस’ म्हणजे काय?

तर पीसीओएस फक्त लठ्ठ महिलांनाच होतो असा एक मोठा गैरसमज तयार झाला आहे. वजन आणि बीएमआय़ एकदम साधारणपणे सामान्य असलेल्या महिलांनाही हा आजार जडू शकतो. वैद्यकीय भाषेत ज्याला लीन पीसीओएस असंही म्हणतात. दरम्यान, वजन सामान्य असलेल्या महिला या आजाराकडे दुर्लक्ष करतात त्यात उपचारांना विलंब होतो.

या आजाराची महत्त्वाची लक्षणे कोणती?

मासिक पाळी अनियमित होणे किंवा कित्येक महिने न येणे. चेहऱ्यावर आणि शरीरावर केस वाढणे. चेहऱ्यावर पिंपल्स येणे आणि डोक्यावरील केस गळणे. वंध्यत्व आणि गर्भधारणेमध्ये वारंवार अडचणी येणे. विनाकारण सतत थकवा, मूड स्विंग्स आणि नैराश्य जाणवणे.

इन्सुलिन रेजिस्टन्सचा धोका

दरम्यान, “लीन पीसीओएसचा सर्वात मोठा धोका हा इन्सुलिन रेडिस्टन्स होणे आहे. यामध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसादच देत नाहीत. त्यामुळे रक्तातील इन्सुलिन वाढत जाते. त्याचा परिणाम म्हणजे महिलांच्या अंडाशयात अँड्रोजन (सेक्स हार्मोन्स) वाढतात. बाहेरून कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. हा आजार आतल्या आत प्रीडायबिटीज आणि पुढे टाईप २ डायबिटीजमध्ये बदलू शकतो,” असे मत डॉ. पलक दिवाण यांनी व्यक्त केले आहे.

या आजाराचे निदान नेमके कसे होते?

या आजाराच्या निदानासाठी केवळ बाह्य लक्षणांकडे लक्ष देऊन चालत नाही तर यावेळी वैद्यकीय चाचण्या करणेही गरजेचे आहे. यात रक्त चाचण्या, फास्टिंग ग्लुकोज, इन्सुलिनची पातळी, हार्मोन प्रोफाईल आणि पेल्विक अल्ट्रासाऊंड स्कॅन यांची वेळोवेळी चाचणी गरजेचील आहे. या आजाराचे वेळीच निदान झाले तर पुढील समस्या टाळता येते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ATM मशिनचे किपॅड धातूचे का असतात, 99% लोकांना माहिती नाही
  • मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी घोषणा केली, विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर!
  • भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटनेने महाड हादरले…
  • राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या बड्या मंत्र्याने थेट सांगितलं; राजकीय वर्तुळात एकच चर्चा!
  • Photographer Murder Case : त्याचा 20 दिवसांपूर्वीच मृत्यू, तरी गर्लफ्रेंडसोबत सुरू होती रोमँटिक चाटिंग, सत्य समोर येताच पोलीसही हादरले; काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in